Vikas Divyakirti: दिल्ली दुर्घटनेप्रकरणी दिव्यकीर्तींनी पूर्ण वातावरणच बदललं! 3 गोष्टींमुळे विद्यार्थी करू लागले कौतुक

Drishti IAS Coaching Vikas Divyakirti: दृष्टी IAS कोचिंग क्लासेसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांच्यासह अन्य शिक्षकांवर विद्यार्थी नाराज होते. पण, आता चित्र बदलत आहे.
Vikas Divyakirti
Vikas Divyakirti
Updated on

नवी दिल्ली- दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये राव IAS कोचिंग सेंटरमध्ये अपघात झाला होता. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तीन मुलांचा मृत्यू झाला होता. यावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. दृष्टी IAS कोचिंग क्लासेसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांच्यासह अन्य शिक्षकांवर विद्यार्थी नाराज होते. पण, आता चित्र बदलत आहे.

विकास दिव्यकीर्ती हे विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी त्यांचं ऐकतात आणि त्यांना मानतात. पण, त्यांनी राजेंद्रनगर घटनेप्रकरणी मौन बाळगल्याने विद्यार्थ्यांचे टीकेचे ते केंद्र बनले होते. दिव्यकीर्ती यांनी निराश केलं अशी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया होती. पण, आता दीव्यकीर्ती यांनी विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे. त्यांच्याविरोधातील सोशल मीडियावरील नकारात्मक पोस्ट देखील कमी झाल्या आहेत.

Vikas Divyakirti
Vikas Divyakirti: 'चूक झाली, संपूर्ण देशाची माफी मागतो'; 'UPSC' विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर दिव्यकीर्तींनी सोडलं मौन

तीन गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या!

विद्यार्थ्यांची नाराजी लक्षात घेत विकास दिव्यकीर्ती यांनी दु्र्घटनेच्या चौथ्या दिवसी मौन सोडले होते. त्यांनी सुरुवातीलाच संपूर्ण देशाची माफी मागत, आपली चूक झाल्याचं मान्य केलं. तसेच, यासंदर्भात भविष्यात काळजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची नाराजी दूर झाली.

दिव्यकीर्ती यांनी राव कोचिंग सेंटरच्या पीडित विद्यार्थ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. श्रेया यादव, तान्या सोनी आणि निविन डाल्विन यांच्या कुटुंबाला प्रत्येक १० लाख देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय भविष्यात त्यांच्या कुटुंबियाला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Vikas Divyakirti
Delhi Coaching Centre : कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास ‘सीबीआय’कडे ; पोलिस, महापालिकेवरही दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरे

दिव्यकीर्ती यांनी अपघातग्रस्त कोचिंगच्या विद्यार्थ्यांना मदत जाहीर केलीये. सामान्य अध्ययन, टेस्ट सिरिज आणि पर्यायी विषयांची तयारी करण्यासाठी मोफत शैक्षणिक सहाय्यता आणि क्लासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी त्यांनी करोल बागेमधील कार्यालयाशी संपर्क करण्यास सांगितलं आहे.

विकास दिव्यकीर्ती यांनी उचललेल्या पाऊलांमुळे विद्यार्थ्यांची नाराजी दूर झाली आहे. सोशल मीडियावर देखील याचे पडसाद दिसत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांचे कौतुक करणारे पोस्ट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.