Drone Attack: इस्राइली व्यापारी जहाजावर भारतीय बंदरात ड्रोन हल्ला! नौदलानं मदतीसाठी पाठवली कुमक

या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत.
Drone Attack: इस्राइली व्यापारी जहाजावर भारतीय बंदरात ड्रोन हल्ला! नौदलानं मदतीसाठी पाठवली कुमक
Updated on

नवी दिल्ली : अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर (MV km Puto) ड्रोन हल्ला झाल्याचं वृत्त आहे. यामुळं भारतीय नौदल अॅलर्टमोडवर आलं आहे. विशेष म्हणजे हे जहाज इस्राइलचं असल्याचं सांगितलं जात असून भारताच्या मंगळुरु इथल्या बंदरावर हा हल्ला करण्यात आल्यानं जहाजावर आग लागली आहे.

या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत. यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं आपलं जहाज पाठवलं आहे. (Drone attack on Israeli merchant ship in Indian port Indian Navy sent ship for help)

व्यापारी जहाजाला टार्गेट

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोरबंदर इथल्या किनाऱ्यावरुन २१७ समुद्र मैलावर अरबी समुद्रात हे व्यापारी जहाज टार्गेट करण्यात आलं. हे जहाज कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातील एका बंदरातून कर्नाटकच्या मंगळुरु बंदराच्या दिशेनं निघालं होतं. (Latest Marathi News)

सध्या या हल्ल्यामुळं जहाजावर लागलेली आग विझली असून याच्या कामकाजावर मात्र परिणाम झाला आहे. या जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाचं जहाज आयसीजीएक्स विक्रमला पाचारण करण्यात आलं आहे. तसेच भीरतीय नौदलाची जहाजं देखील आपल्या विशिष आर्थिक क्षेत्रात या जहाजाच्या दिशेने निघाले आहेत.

Drone Attack: इस्राइली व्यापारी जहाजावर भारतीय बंदरात ड्रोन हल्ला! नौदलानं मदतीसाठी पाठवली कुमक
Manoj Jarange : जरांगेंच्या मुंबईतील आमरण उपोषणाच्या घोषणेवर बच्चू कडूंची सडेतोड भूमिका; म्हणाले, पायी मोर्चा...

सेलरच्या टीममध्ये २० भारतीय नागरीक

संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आयसीजीएस विक्रमला भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या गस्तीवर तैनात करण्यात आलं होतं. पण या जहाजाला जेव्हा संकटात अडकलेल्या जहाजाबाबत निर्देश मिळाल्यानंतर हे जहाज मदतीसाठी रवाना झालं. या जहाजावरील सर्व सेलर हे सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये २० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.