PM मोदींनी प्रत्यक्ष भेट घेत नवनिर्वाचित राष्ट्रपतींना दिल्या शुभेच्छा

या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
PM Modi_Pres Murmu_JP Nadda
PM Modi_Pres Murmu_JP Nadda

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी म्हणजेच आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील. 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. त्यानंतर 25 जुलै 2007 रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

राहुल गांधीकडून अभिनंदन

भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी दिल्या शुभेच्छा 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील ट्वीट करत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन . लोकांच्या आशा आणि आकांक्षांना आवाज देण्याची तुमची भूमिका अनुकरणीय आहे. मला आशा आहे की तुमच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आपल्या देशातील लोक नवीन भारताच्या उभारणीत अग्रेसर योगदान देतील, असे त्यांनी म्हटले आहे.

CM शिंदेंकडून मुर्मूंचे अभिनंदन!

भारतीय प्रजासत्ताकच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा!, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM मोदींनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांच्याकडून मुर्मूंचं अभिनंदन

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन. त्या गावात, गरीब-वंचित लोकांसोबत झोपड्यांमध्येही लोककल्याणासाठी सक्रीय राहिल्या आहेत. आज त्या त्यांच्यामधून देशाच्या सर्वोच्चस्थानी पोहोचल्या आहेत. ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे.

यशवंत सिन्हांकडून द्रौपदी मुर्मूंचं अभिनंदन

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर मुर्मू यांचं सिन्हा यांनी अभिनंदन केलं आहे. मला तसेच भारतीयांना आशा आहे की, मुर्मू निडरपणे आणि पक्षपातीपणा न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील. देशवासीयांच्यावतीनं मी त्यांचं अभिनंद करतो.

तिसऱ्या फेरीत मुर्मूंचा विजय निश्चित

तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत सत्ताधारी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं मिळाली तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना ५१२ मतं मिळाली. त्यामुळं या निवडणुकीत मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला.

द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू यांनी मतमोजणीच्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीत एकूण पात्र मतांच्या ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. त्यामुळं त्या आता देशाच्या नव्या राष्ट्रपती होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत १७ खासदारांकडून क्रॉस-वोटींग

राष्ट्रपती निवडणुकीत १७ खासदारांकडून क्रॉस-विटींग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे खासदार विरोधी पक्षाचे असून त्यांनी एनडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे.

मुर्मू यांच्या मूळगावी जल्लोषाला सुरुवात 

द्रौपदी मुर्मू यांना १३४९ तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली आहेत

दोन टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून द्रौपदी मुर्मू यांना १३४९ तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली आहेत

भाजपच्या आणि एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित

भाजपच्या आणि एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी संपली 

दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी पार पडली असून थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहे.

भाजप समर्थकांकडून जल्लोष सुरू

भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून भाजपकडून देशभर जल्लोष सुरू केला आहे. त्याचबरोबर पुण्यातही भाजप नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून फटाकेबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला जात आहे.

दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांचं मुल्यांकन (पहिली फेरी)

  • द्रौपदी मुर्मू - ३ लाख ७८ हजार

  • यशवंत सिन्हा - १ लाख ४५ हजार

आमदारांच्या मताची मोजणी सुरू

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून त्यामध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. आता आमदारांच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

पहिल्या फेरीतील मतमोजणी कशी झाली पाहा

खासदार मतांची मोजणी पूर्ण झाली असून मुर्मू यांनी सिन्हा यांच्या तुलनेत 72.19% मते जिंकली आहेत.

पहिल्या फेरीत मुर्मूंची आघाडी

पहिल्या फेरीतील मतमोजणी पार पडली असून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवा यशवंत सिन्हा यांना अवघे २०८ मतं मिळाले आहेत. तर या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अवैध ठरली आहेत.

द्रौपदी मुर्मू यांच्या गावात जल्लोषाला सुरूवात

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. त्यामुळे निकाल लागायच्या आधीच मुर्मू यांच्या गावातील घराच्या समोर उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान संसदेत मतमोजणी पार पडत आहे.

संसदेत मतमोजणीला सुरूवात 

संसदेत मतमोजणीला सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने मत मोजणी होणार आहे.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू? 

राष्ट्रपती पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या द्रौपदी मुर्मू कोण आहेत? त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

PM Modi_Pres Murmu_JP Nadda
कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?

राष्ट्रपतीपदांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार म्हणून आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे असं खासदार आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत.

आज सोनिया गांधी यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. हा राजकीय सूडाचा भाग आहे असं म्हणत यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ईडीच्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे.

सर्वांत अगोदर संसद भवनात झालेल्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यातील मतांची मोजणी होणार आहे. संसद भवमात एकूण ७३० मतदान झालं आहे. देशाचे १५वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू किंवा यशवंत सिन्हा यांची आज निवड केली जाणार आहे.

'एनडीए'च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विक्रमी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसद भवनाच्या 63 नंबर खोलीत होणार मतमोजणी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होणार असून, सकाळी 11 या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी संसद भवनात तयारीला वेग आला आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान पार पडल्यानंतर सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या असून, संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी पार पडणार आहे.

द्रौपदी मुर्मूंच्या मूळ गावी विजयोत्सवाची तयारी

राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडं जड असल्याने मतमोजणीत त्या विजयी होतील असे मानले जात आहे. दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव ओडिशातील रायरंगपूरमध्येही विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. येथे निकाल लागल्यानंतर मिठाई वाटण्यात येणार असून, यासाठी रायरंगपुरात लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे स्थानिक नेते तपन महंता यांनी सांगितले की, विजयानंतर वाटपासाठी 20 हजार लाडू बनवले जात आहेत. तसेच 100 बॅनरही करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.