PNS Ghazi: पाकच्या गाझी पाणबुडीचे मिळाले अवशेष! भारताच्या विशेष पाणबुडीनं लावला शोध

भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानची गाझी पाणबुडीला भारतानं जलसमाधी दिली होती.
PNZ Gazi
PNZ Gazi
Updated on

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमध्ये सन १९७१ मध्ये झालेल्या युद्धावेळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं पाकिस्तानची अत्याधुनिक पाणबुडी PNS गाझीला जलसमाधी दिली होती. या पाणबुडीचे अवशेष आता सापडले आहेत.

भारतीय नौदलाची डीप सबमर्जेस रेस्क्यू व्हेईकलने (DSRV) हे अवशेष शोधून काढले आहेत. मिलन २०२४ अभ्यासादरम्यान रेस्क्यू ऑपरेशनची प्रात्यक्षिकं सुरु असताना पाणबुडीला हे अवशेष आढळून आले. (drown pns ghazi submarine wreckage found indian special submarine near visakhapatanam sea)

PNZ Gazi
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा 'या' दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

पाकिस्तानी नौदलाची फ्रिगेड क्लास पाणबुडी PNS Ghazi ही १९७१ च्या युद्धावेळी विशाखापट्टणम जवळ समुद्रात रहस्यमयरित्या जलसमाधी मिळाली होती. यामध्ये ९३ पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले गेलो होते. (Latest Marathi News)

याशिवाय एक जपानी पाणबुडी RO 110 देखील याच ठिकाणी मिळाली आहे. या पाणबुडीला रॉयल इंडियन नेव्ही आणि ऑस्ट्रेलियन नौदलानं दुसऱ्या महायुद्धावेळी पाण्यात बुडवलं होतं. गेल्या ८० वर्षांपासून ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी पडून आहे.

PNZ Gazi
India Bloc Mamata Banerjee: इंडिया आघाडीला 'अच्छे दिन'! दिल्ली, गुजरात, युपीनंतर आता ममतांसोबत काँग्रेसची जागा वाटपावर चर्चा

२०१८ पूर्वी भारताकडं DSRV सारखं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. त्यामुळं भारताला अशा प्रकारेची जुनी जहाजं आणि पाणबुड्यांचे अवशेष शोधता येत नव्हते. पण आता भारताकडं हे नवं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, यामुळं समुद्रात खोलवर अशा बुडालेल्या नौकांचा शोध घेता येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.