फॅबीफ्लूच्या वाटपाप्रकरणी गौतम गंभीर अडचणीत

gautam ganbhir
gautam ganbhir
Updated on

नवी दिल्ली- देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना स्थिती गंभीर बनली होती. हॉस्पिटल समोर रुग्ण आणि नातेवाईकांच्या रांगा लागल्या होत्या. हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवत होती. अशा काळात काही राजकीय नेते आणि कलाकार कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले होते. राजकीय नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसलेली औषधे कोरोना रुग्णांना पुरवली होती. दिल्लीतील भाजपचे खासदार गौतम गंभीर ( BJP MP Gautam Gambhir) यांनी कोरोना काळात रुग्णांना फॅबीफ्लू Fabiflu चा पुरवठा केला होता. या प्रकरणी ते आता अडचणीत आले आहेत. (Delhi High Court directed Drug Controller General of India investigation distribution Covid treatment drug Fabiflu BJP MP Gautam Gambhir )

gautam ganbhir
भारतात लसीचं उत्पादन ८ कोटी पण फक्त पाच कोटी लोकांचं लसीकरण

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला गौतम गंभीर यांनी फॅबीफ्लूच्या केलेल्या पुरवठ्याप्रकरणी तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. बेकायदेशीरपणे औषधांचा साठा केल्याप्रकरणी गौतम गंभीर आणि इतर दोघांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटलं की, त्यांचा उद्धेश जरी चांगला असला तरी, त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा करणं चुकीचं आहे. ड्रग कंट्रोलरनी यामध्ये लक्ष द्यावं. गौतम गंभीर राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू आहेत. आम्हाला खात्री आहे की, त्यांचा हेतू चांगला होता. पण, त्यांनी जे केलं ते चुकीचं आहे. मग ते जाणूनबुजून केलं नसलं तरी.

gautam ganbhir
कोरोना पसरण्याआधी वुहानच्या लॅबमधील डॉक्टर पडले होते आजारी

गौमत गंभीर यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 2628 फॅबीफ्लू विकत घेतले असल्याचं कोर्टाने नोंदवलं. इतक्या मोठ्या प्रमाणात फॅबीफ्लू औषध एका संस्थेला कशापद्धतीने देण्यात आली, असा सवाल कोर्टाने विचारला. याप्रकरणात आठवड्याभरात रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश कोर्टाने ड्रग कंट्रोलर ऑफ जनरलला दिले आहेत. कोर्टाने गौतम गंभीर यांच्याशिवाय आम आदमी पार्टीचे आमदार प्रवीण कुमार आणि प्रिती कुमार यांच्याविरोधातही तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या नेत्यांनीही कोरोना काळात औषधांचा पुरवठा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.