नवी दिल्ली : भारताचा समुद्र किनारा आता ड्रग्जचं आगार बनतं चालल्याचं चित्र आहे. कारण भारतीय तटरक्षक दलानं नुकत्याच केलेल्या एका कारवाईत तब्बल ५ टन ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका मच्छिमारांच्या बोटमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा साठा असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी अदानींच्या मुंद्रा पोर्टवर ३ टन ड्रग्ज पकडण्यात आलं होतं.