मणिपूरमध्ये मोठी कारवाई! गोदामातून 500 कोटीचं ड्रग्ज जप्त

drugs file photo
drugs file photogoogle
Updated on

मणिपूर पोलिस आणि आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील सीमावर्ती शहरातील मोरेह येथील एका गोदामातून अंदाजे 500 कोटी रुपयांचे अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही आजपर्यंत मणिपूरमध्ये करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगीतले जात आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, मोरेह येथील एका गोदामातून जवळपास 500 कोटी किमतीचे अवैध अमली पदार्थ जप्त करत तेंगनौपाल पोलिस आणि 43 आसाम रायफल्सने मोठी कामगिरी केली आहे. ते पुढे म्हणाले की, याप्रकरणी म्यानमारच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे, तर छापेमारीनंतर संशयित हेरॉईन आणि क्रिस्टल मेथची पाकिटे असलेली साबणाच्या मोठ्या पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच राज्य सरकारच्या 'वॉर ऑन ड्रग्ज' उपक्रमांतर्गत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सिंग यांनी सांगितले.

drugs file photo
बेंगळुरूचे ऑमिक्रॉनमधून बरे झालेले डॉक्टर पुन्हा पॉझिटिव्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई विषेश इंटेलिजन्सच्या आधारे करण्यात आली, त्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमेजवळील मोरेह शहरातील काही ठिकाणे म्यानमारमधून भारतात तस्करी होत असलेल्या अवैध ड्रग्सची साठवण, पॅकेज आणि वितरण करण्यासाठी वापरली जात असल्यीचे समोर आले. छाप्यात पकडलेल्या व्यक्तीला मोरेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात असून पुढील तपास सुरू आहे.

drugs file photo
Jio vs Airtel vs VI: 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.