बांग्लादेशमुळे भारतीय शेतकरी त्रस्त ! आयात शुल्क वाढीने पडले संत्र्याचे भाव, निर्यात २०० ट्रकवरून आली २५ वर

अस्मानी संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील समोर जावे लागत आहे. बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्र्याचे भाव पडले आहेत.
बांग्लादेशमुळे भारतीय शेतकरी त्रस्त ! आयात शुल्क वाढीने पडले संत्र्याचे भाव,  निर्यात २०० ट्रकवरून आली २५ वर
Updated on

Orange Export: संत्र्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच सतत तीन वर्षांपासून नुकसान होऊनही ही शासन नुकसान भरपाई देण्यास तयार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील समोर जावे लागत आहे. बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्र्याचे भाव पडले आहेत.

आंबट गोड चवीसाठी नागपूर-विदर्भातील संत्रा जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र, आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून प्रती किलो तब्बल ६३ रुपये केले आहे. याचा जबर फटका निर्यातीला बसला असून, यामुळे संत्र्यांची उचल कमी झाली आहे. परिणामी संत्र्याचे भाव गडगडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात २५ ते ४० हजार रुपये प्रती टनाने विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे भाव २० ते २५ हजार रुपये टनापर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसतो आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो. विदर्भातील एकूण संत्रा उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. गेल्यावर्षी विदर्भातील दररोज सुमारे २०० ट्रक संत्र्याची बांगलादेशला निर्यात व्हायची. एका ट्रॅकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्रा असतो. गेल्यावर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्यात आला.

मात्र, यावर्षी बांगलादेशाने गेल्यावर्षी ५१ रुपये प्रती किलो असलेले आयात शुल्क यावर्षी वाढवून ६३ रुपये केले. गेल्या तीन वर्षांत आयात शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून संत्र्याची उचल कमी झाली असून, दररोज जेमतेम २० ते २५ ट्रकच माल निर्यात केला जात आहे. विदर्भातील संत्रा नागपुरातील कळमना मार्केटसह कोलकाता, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, बंगलोरमध्ये विकला जातो. मात्र, निर्यात कमी झाल्याने या देशांतर्गत बाजारपेठांमध्येही संत्र्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गतही संत्र्यांची उचल घटली आहे. परिणामी भाव टनामागे १० ते १५ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. (Latest Marathi News)

बांग्लादेशमुळे भारतीय शेतकरी त्रस्त ! आयात शुल्क वाढीने पडले संत्र्याचे भाव,  निर्यात २०० ट्रकवरून आली २५ वर
भारताचे सुप्रीम कोर्ट हे 'लोकांचे न्यायालय...CJI चंद्रचूड यांनी अमेरिकेच्या SC शी केली तुलना

गेल्या तीन वर्षांत बांगलादेशने संत्र्यांवरील आयात शुल्क तिप्पट केले. यावर्षी ऐन हंगामात पुन्हा वाढ केली. याचा परिणाम निर्यातीवर होत असून, संत्र्याचे भाव गडगडले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे संत्रा गळाला. उत्पादन घटले. आता वाढीव आयात शुल्कामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांवर दुहेरी मार पडत आहे. केंद्र सरकारने त्वरित याची दखल घेत बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे.- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज

दोन आठवड्यापूर्वी २५ ते ३५ हजार रुपये टन या दराने विकला जाणारी संत्री सध्या १८ ते २३ हजार रुपये टनापर्यंत विकला जात आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश नागपूर, अमरावती जिल्ह्यातील संत्र्याची सर्वात प्रमुख बाजारपेठ बनली आहे. जर बांगलादेशमधील संत्र्यावरील आयात शुल्काचा प्रश्न केंद्र सरकारने लवकर सोडविला नाही, तर भविष्यात विदर्भातील संत्र्यावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- रुपेश वाळके, संत्रा उत्पादक, शेतकरी

बांगलादेशने असे वाढविले आयात शुल्क

वर्ष आयात शुल्क

२०१९ २० रु.

२०२० ३० रु.

२०२१ ५१ रु.

नोव्हें. २०२२ ६३ रु.

किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे म्हणाले की, " आयात शुल्क ठरवणे हा बांगलादेशाचा अंतर्गत विषय असून आम्ही राज्यसभा खासदार डॅा. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात वाणिज्य मंत्रालयाला निवेदन दिले आहे. लवकरच यावर तोडगा निघेल."(Latest Marathi News)

बांग्लादेशमुळे भारतीय शेतकरी त्रस्त ! आयात शुल्क वाढीने पडले संत्र्याचे भाव,  निर्यात २०० ट्रकवरून आली २५ वर
Hardik Pandya : "मी टीम सोबतच! प्रत्येक बॉलला..." वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर पांड्याची भावनिक प्रतिक्रिया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.