उत्तर प्रदेशातील खुटार (शहाजहानपूर) येथील खुटार-गोला रोडवर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ढाब्याच्या बाहेर उभ्या असलेल्या व्होल्वो बसला खडी भरलेल्या डंपरची धडक बसून बस उलटली.
या अपघातात बसमध्ये बसलेले 35-40 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खुटार सीएचसी येथे आणण्यात आले तेथून प्राथमिक उपचारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. (Khutar Volvo Accident Uttar Pradesh)
शाहजहांपूरच्या खुटार पोलीस स्टेशन परिसरात हे सर्व लोक इतर साथीदारांसह सीतापूरहून पूर्णागिरी (उत्तराखंड) येथे खासगी बसने जात होते. शनिवारी रात्री 12.15 वाजता जेवण व अल्पोपाहारासाठी एका ढाब्यावर थांबले असता भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची धडक बसून उलटली.
उत्तराखंडमधील पूर्णागिरी येथे देवी मातेचा दरबार आहे. तेथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. शनिवारी रात्री भाविकांचा जत्था खासगी बसने सीतापूरहून सिंदौलीकडे रवाना झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गोला मार्गे खुटार येथे पोहोचली होती. तेथे ड्रायव्हरने अल्पोपाहार आणि जेवणासाठी बस एका ढाब्याच्या बाहेर उभी केली. काही भाविक ढाब्याच्या आत गेले होते, काही बसमध्ये बसून राहिले तर बाकीचे इकडे तिकडे फिरत होते. त्याचवेळी भरधाव वेगात निघालेल्या डंपरचे नियंत्रण सुटले आणि ढाब्याच्या बाहेर उभ्या असलेल्या बसवर जाऊन आदळला, त्यानंतर तो तेथेच उलटला. डंपरची धडक एवढी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातानंतर डंपर चालकाचा पत्ता लागला नाही. डंपर चालक झोपेत किंवा नशेत गाडी चालवत असल्याचा संशय आहे. भरधाव वेगात तो अचानक राँग साईडला जाऊन बसला धडकला आणि उलटला. डंपरने बसमध्ये आणि आजूबाजूला वाळू आणि खडी पसरल्याने मदतकार्य अवघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रात्री दोन वाजेपर्यंत बसचा खराब झालेला भाग आणि पलटी झालेल्या डंपरखाली चालकाचा शोध सुरू होता. अपघातावेळी डंपर चालक आणि त्याचा क्लिनर गोंधळातच पळून गेला असण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.