Ayodhya Case: रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश देवासमोर बसून काय म्हणाले? चंद्रचूड यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं

CJI DY Chandrachud's Statement: आपला विश्वास, आस्था असेल, तर देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतो, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कन्हेरसर (ता. खेड) येथे केले.
 CJI DY Chandrachud Seeking Divine Guidance in Legal Matters
CJI DY Chandrachud emphasizes the need for spiritual reflection during the Ayodhya case hearings.Esakal
Updated on

Ram Janmabhoomi Case Verdict: अयोध्या प्रकरणात मार्ग कसा शोधायचा हे कळत नव्हते. त्या काळात जेव्हा मी दैनंदिन पूजेला बसायचो, तेव्हा मार्ग तुम्ही शोधून द्या, असे भगवंताला सांगायचो. आपला विश्वास, आस्था असेल, तर देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतो, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कन्हेरसर (ता. खेड) येथे केले.

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी आज (ता. २०) खेड तालुक्यातील कनेरसर या त्यांच्या मूळ गावी भेट दिली. कनेरसर ग्रामस्थांनी यमाई मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.