Early Age Retirement : वयाच्या 45 व्या वर्षी सेवानिवृत्ती अन् लाइफ सेट ही आहे बेस्ट स्ट्रॅटेजी

वेळेआधीच तुम्ही निवृत्त झाले तर उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पैसा कुठून आणाल असाच प्रश्न तुम्हालाही आधी पडेल
Early Age Retirement
Early Age Retirement esakal
Updated on

Early Age Retirement : सेवानिवृत्तीनंतर जीवन आरामदायी कसं जगता येईल हा विचार जवळपास प्रत्येकच नोकरी करणाऱ्या लोकांना येतो. पण अनेकांना विशिष्ट वयानंतर काम करण्याचा कंटाळा येतो आणि त्यांना लवकर रिटायरमेंट घ्यायची असते. मात्र वेळेआधीच तुम्ही निवृत्त झाले तर उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पैसा कुठून आणाल असाच प्रश्न तुम्हालाही आधी पडेल. तेव्हा त्यासाठी नियोजन कसं करायंच ते आपण आज जाणून घेणार आहोत.

फायर स्ट्रॅटेजी

सध्या फायर स्ट्रॅटेजी सगळीकडे फार लोकप्रिय होऊ लागली आहे. फायर स्ट्रॅटेजीद्वारे तुम्ही वयाच्या 45 वर्षात सेवानिवृत्त होऊ शकता.

फायर स्ट्रॅटेजीचा फायदा काय?

फायर स्ट्रॅटेजीचे तीन मूलभूत तत्व आहेत. सर्वप्रथन तुम्हाला तुमच्या उत्तपन्नातील 50-70 टक्के रकमेची बचत करावी लागेल. तुम्हाला तुमची बचत कमी किमतीच्या इंडेक्स फंडाच्या पसंतीच्या साधनामध्ये गुंतवावी लागेल. याचाच अर्थ, अधिक बचत, खर्चात कपात आणि पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक ही त्रीसुत्री फायद्याची ठरेल.

पैशांची बचत कशी कराल?

तुमच्या लवकर सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी तुम्हाला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे? म्हणजेच तुमचा मासिक खर्च किती आहे? तुम्हाला किती लवकर निवृत्त व्हायचे आहे? याचे आराखडे आधीच बांधा. यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर 4% नियम असे आहे. जर तुम्ही १ कोटी रुपये घेऊन निवृत्त झालात, तर ४% नियमानुसार, तुम्ही दरवर्षी १ कोटी रुपयांपैकी ४% वापरू शकतात. म्हणजेज ४ लाख रुपये. असे करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे या नियमाकडे उलटे पाहणे. म्हणूनच ४% उलट करणे २५ पट आहे. याचा अर्थ असा की तुमचा सेवानिवृत्ती निधी तुम्ही पहिल्या वर्षी खर्च करत असलेल्या रकमेच्या २५ पट असावा. (Pension)

म्हणजेत तुम्हाला निवृत्तीच्या पहिल्या वर्षात जर ५ लाखांची गरज असेल तर तुमच्याकडे २५ पटीने म्हणजेच १.२५ कोटी रुपये असायला हवे.

Early Age Retirement
Old Pension Strike : संप मिटल्याने शिक्षकांना दिवसाला शेकडो उत्तर पत्रिका तपासणीचे टार्गेट

उत्पन्न वाढवा अन् पैसे वाचवा

तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग वाचवण्यासाठी तुम्हाला नोकरीच्या सुरुवाती दिवसापासूनच तयारीला लागावे लागेल. या महागाईच्या युगात निम्म्या उत्पन्नाची बचत करणे अशक्य आहे. अशावेळी योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे फायद्याचे ठरते. किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपल्यातील कौशल्य वाढवून अर्धवेळ नोकरी करु शकतात. दुसऱ्या उत्पन्नाचा किमान स्त्रोत चालू ठेवणेही फायद्याचे ठरते. (Earning)

Early Age Retirement
Early Retirement : अवघ्या चाळीशीत व्हा निवृत्त आणि जगा निवांत; पैशांचीही कमतरता नसेल

पॅसिव्ह इन्कम

फायर स्ट्रॅटेजीचा पर्याय निवडताना पॅसिव्ह इन्कमवरही लक्ष केंद्रित करु शकतात. तुमच्या शेअर्समधून लाभांश, एफडीचे व्याज, ब्लाॅगचे उत्पन्न , यूट्यूब चॅनलची कमाई, प्राॅपर्टीचे भाडे इत्यादी असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.