Earthquake : भूकंप झाल्यास सर्वात आधी काय करायला हवं ?

मागच्या काही दिवसांपूर्वी रात्रीच्या 1 वाजून 57 मिनिटांनी भारतासह चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
Earthquake news
Earthquake newsesakal
Updated on

Earthquake : भूकंप अचानकचं येतो, यातून ना आपल्याला काही विचार करण्याची संधी मिळते ना लगेच सावरायची. आपण आपल्या संरक्षणाचा विचार करतो तेवढ्या काही मिनिटांतच आजूबाजूला सगळीकडे विध्वंस झालेला असतो. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. म्हणजे अचानक भूकंप झालाच तर तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल हे यात सांगितलंय.

Earthquake news
Tonga Earthquake: टोंगामध्ये 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी...

काय करावे आणि काय करु नये

मागच्या काही दिवसांपूर्वी रात्रीच्या 1 वाजून 57 मिनिटांनी भारतासह चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी होती. नेपाळमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.

Earthquake news
Earthquake : नेपाळ आणि उत्तर भारतत भूकंप; ६ जणांचा मृत्यू; ५ जखमी

भूकंप आल्यावर तात्काळ काय कराल?

भूकंपाच्या वेळी शक्य तितकं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की काही भूकंप प्रत्यक्षात भूकंपपूर्व हादरे असतात आणि मोठा भूकंप लवकरच येण्याची शक्यता असते. हालचाल कमी करून लवकरच जवळच्या सुरक्षित ठिकाणी जा. भूकंप थांबेपर्यंत घरातच राहा आणि बाहेर जाण सुरक्षित आहे याची तुम्हाला खात्री पटल्यावरचं घराबाहेर पडा.

Earthquake news
Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत हादरला

जमिनीवर झोपा. मजबूत टेबल किंवा फर्निचरखाली बसून स्वतःला झाकून घ्या. तुमच्या जवळ टेबल किंवा डेस्क नसल्यास, तुमचा चेहरा आणि डोके तुमच्या हातांनी झाकून घ्या आणि एका कोपऱ्यात झुका.खोलीच्या कोपऱ्यात, टेबलाखाली किंवा पलंगाखाली लपून आपले डोके आणि चेहरा सुरक्षित ठेवा.

Earthquake news
Satara Earthquake: साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

काच, खिडक्या, दारे, भिंती आणि इतर कोणत्याही गोष्टीपासून दूर राहा (जसं की झुंबर).जेव्हा भूकंप येतो तेव्हा अंथरुणावर पडून रहा. उशीने आपलं डोक झाकून घ्या. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात जी गोष्ट पडू शकते तिथून तात्काळ बाजूला व्हा.जर तुम्ही दाराजवळ असाल तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

Earthquake news
Earthquake : धक्कादायक! लातूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के,नागरिक भयभीत

जोपर्यंत भूकंपाची कंपन थांबत नाहीत तोपर्यंत घरातच रहा. संशोधनात असं आढळून आलंय की, जे लोक इमारतींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तेच जखमी होतात.पॉवर आउटेज किंवा स्प्रिंकलर सिस्टम किंवा फायर अलार्म ट्रिगर होऊ शकतं याकडे लक्ष ठेवा.

Earthquake news
China Earthquake: जोरदार भूकंपाच्या झटक्यांनी चीन हादरलं; रिश्टर स्केलवर 6.8 तीव्रतेची नोंद

बाहेर असाल तर...

तुम्ही आहात तिथून हलू नका. पण इमारती, झाडे, पथदिवे आणि युटिलिटी वायरपासून दूर राहा. तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर कंपन थांबेपर्यंत तिथेच रहा. सर्वात मोठा धोका इमारतींपासून असतो. बहुतेक वेळा भिंत पडल्यामुळे, काच फुटल्यामुळे लोक जखमी होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()