Earthquake: दक्षिण पश्चिम भारतीय रिजला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रता

Earthquake: दक्षिण पश्चिम भारतीय रिजवर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे.
Earthquake
Earthquake
Updated on

Earthquake:

नवी दिल्ली : दक्षिण पश्चिम भारतीय रिजवर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे. आज पहाटे 3.39 वाजता हा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे.

काल (शनिवार) हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यासह शिमला आणि कुल्लूच्या वरच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंदवण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (Latest Marathi News)

यापूर्वी हिमाचलमध्ये तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामध्ये चंबा हे केंद्र मानले जाते. डोंगराळ भाग असल्याने हिमाचलमध्ये भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.

Earthquake
Maldives President: मालदीवच्या हट्टीपणामुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू? उपचारांसाठी करायचं होतं एअरलिफ्ट, राष्ट्रपतींनी नाकारली भारतीय विमानाला परवानगी

तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, शनिवारी सकाळी अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील निकोबार बेटांजवळ होता. या भूकंपानंतर कोणतेही मोठे नुकसान किंवा हानी झाल्याचे वृत्त नाही. याआधीही 10 जानेवारीला याच परिसरात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाने लोकांनाही धक्का बसला आहे, मात्र मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake
Weather Update: देशभरात थंडीचा कडाका! तर 'या' राज्यात पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील काय परिस्थिती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.