काठमांडू - नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण भूकंपामध्ये १४० नागरिक मृत्युमुखी पडले तर शेकडोजण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवरती ६.४ एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपामुळे अनेक भागांतील घरांची पडझड झाली असून शेकडो रस्ते आणि पुलांचेही मोठे नुकसान झाले.
या भीषण धरणीकंपामुळे नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काठमांडूपासून पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जाजरकोट या जिल्ह्यामध्ये होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप सर्वेक्षण आणि संशोधन केंद्राकडून देण्यात आली. सायंकाळी ११.४७ च्या सुमारास हा भूकंप झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ताज्या भूकंपाचे धक्के भारतात दिल्ली आणि काही लगतच्या राज्यांमध्येही जाणवले. या भूकंपानंतर लष्कराने मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली. या भूकंपानंतर १५९ धक्के जाणवल्याचे भूकंप सर्वेक्षण आणि संशोधन केंद्राकडून सांगण्यात आले. अनेक लोकांनी भीतीमुळे रात्रभर घराबाहेरच राहणे पसंत केले.
या संकटाच्या काळामध्ये भारत नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभा असून आम्ही आमच्याकडून सर्वोतपरी मदत करू. या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या आणि जखमी झालेल्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
बिहारमध्येही जाणवले धक्के
नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपाचे धक्के बिहारमध्येही जाणवले पण त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. पाटणा, कटिहार, पूर्व चंपारण्य, दरभंगा, मुझफ्फरपूर, पश्चिम चंपारण्य, सासाराम, नवादा आणि भारत- नेपाळ सीमेवर लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक हानी
या भूकंपाचा सर्वात मोठा फटका हा जाजरकोट आणि रुकूम या जिल्ह्यांना बसला असून येथेच सर्वाधिक जीवित तसेच वित्तहानी झाल्याचे म्हटले आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून १४० लोक ठार झाले असून तितकेच लोक गंभीर जखमी झाल्याचे बोलले जाते, असे सरकारने सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.