Election Commission: PM मोदींविरोधात टिप्पणी! निवडणूक आयोगाची थेट केजरीवाल अन् प्रियांका गांधींना नोटीस

Election Commission
Election Commission
Updated on

Election Commission: निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी आम आदमी पक्षाला (AAP) सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधानांविरोधात केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पण्यांसाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली.  प्रियांका गांधी वाड्रा यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाने त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या आरोपाला उत्तर देण्यास सांगितले. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय संयोजक आहेत.

भाजपने १० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "अत्यंत अस्वीकार्य" आणि "अनैतिक" व्हिडिओ क्लिप आणि टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल कारवाईची मागणी केली होती.

Election Commission
Elvish Yadav : एल्विशच्या 'त्या' पार्टीत खरचं काय चालायचं? राहुलच्या 'डायरी'तून समोर येणार खळबळजनक खुलासे!

अरविंद केजरीवाल आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात 'अपमानास्पद टिप्पणी' केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

AAP ने गेल्या बुधवारी सोशल मीडिया प्लटफॉर्म 'एक्स'वर उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांची व्हिडिओ स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी  अदानी आणि मोदींचा फोटो पोस्ट केला आणि पंतप्रधान लोकांसाठी काम करत नसून उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. 

Election Commission
Ramdas Kadam: मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर रामदास कदमांची भाषा बदलली, म्हणाले, गजाभाऊंना...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.