Assembly Elections 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. यामध्ये राजस्थानात २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होतं. पण आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. पण निकाल मात्र आहे त्याच दिवशी ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. (ECI changes date of Assembly poll in Rajasthan to 25th November from 23rd November)
या बदलाबाबत निवडणूक आयोगानं अधिकृत निवदेन जाहीर केलं आहे. यामध्ये म्हटलं की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि माध्यमांनी उपस्थित केलेल्या एका विषयाला अनुसरुन हा बदल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेला अर्थात २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानात लग्नाचे मुहूर्त असल्यानं या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक लग्न समारंभात व्यस्त असणार आहेत. तसेच यामुळं वाहतुकीची देखील समस्या निर्माण होऊ शकते. यामुळं मतदानावर परिणाम होऊन मतदानाचं प्रमाण घटू शकतं. (Marathi Tajya Batmya)
राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख - 30 ऑक्टोबर 2023 (सोमवार)
नामांकन करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 (सोमवार)
नामांकन छाननीची तारीख - 7 नोव्हेंबर 2023 (मंगळवार)
माघार घेण्याची शेवटची तारीख - 9 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)
मतदानाची तारीख - 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार)
मतमोजणीची तारीख - ३ डिसेंबर २०२३ (रविवार)
निवडणूक पूर्ण होण्याची तारीख - 5 डिसेंबर 2023 (मंगळवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.