नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटळ्याप्ररकरणी ईडीनं नुकतीच अटक केली. या कारवाईपूर्वी हायव्होलटेज ड्रामा घडला होता. पण आता ईडीनं सोरेन आणि काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांचा संबंध जोडल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. त्यांच्यामध्ये ३५१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
सोरेन-साहू यांच्यात नेक्सस?
ईडीनं दावा केला आहे की, हेमंत सोरेन आणि धीरज साऊ यांच्यामधील एक नेक्सस समोर आलं आहे. यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय खळबळ माजण्याची शक्यता आहे. (Latest Maharashtra News)
सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार धीरज साहूंच्या नावावर
हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार ईडीनं त्यांच्या दिल्ली येथील घरातून जप्त केली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही बीएमडब्ल्यू कारची नोंदणी काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्यावर नावावर आहे, असा दावा ईडीनं केला आहे.
यावरुन भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला असून इंडिया आघाडीला बांधून ठेवणारा भ्रष्टाचार हाच फेविकॉल आहे. त्यामुळं काँग्रेस सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाविरोधात काहीही बोलत नाहीए. तसेच सोरेन हे देखील काँग्रेसविरोधात काहीही बोलत नाहीएत, असं भाजपनं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
साहू यांच्या फॅक्टरीतून ३०० कोटींची रोकड जप्त
दरम्यान, काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून तसेच ओडिशा इथल्या मद्य निर्मिती कारखान्यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. ही रक्कम मोजण्यासाठी ४० नोटा मोजण्याच्या मशिन मागवण्यात आल्या होत्या.
तसेच हा पैसा जप्त करण्यासाठी दोन मोठे ट्रकही मागवण्यात आले होते. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस भ्रष्टाचारात बरबटला आहे असा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.