लालू यादव कुटुंबाच्या कोट्यवधीच्या संपत्तीवर जप्ती; 'जमिनीच्या मोबदल्यात नोकरी' प्रकरणी कारवाई

Lalu Yadav Family
Lalu Yadav Family
Updated on

नवी दिल्ली - जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ईडीने लालू यादव यांच्या कुटुंबीयांची सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

या प्रकरणी राजदचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी सुरू आहे. नुकतेच सीबीआयने या तिघांविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.

Lalu Yadav Family
Rupali Chakankar : मनोहर भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करा; चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी

गेल्याच महिन्यात सीबीआयने दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात लालूप्रसाद यादव कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात लाचेने जमीन घेतल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. लालू यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भोला यादव आणि हृदयानंद चौधरी हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत.

Lalu Yadav Family
Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला एक लाखाच्या बक्षिसाची घोषणा

राजद नेते लालू यादव यांचे ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने २७ जुलै रोजी अटक केली होती. भोला यादव हे २००४ ते २००९ या कालवाधीत तत्कालीन रेलमंत्री लालूप्रसाद यादव यांचे ओएसडी होते.

बिहारमधील हा घोटाळा १४ वर्षांपूर्वीचा आहे. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि लालू यादव रेल्वेमंत्री होते. या प्रकरणी सीबीआयने १८ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी आधी पर्यायी लोकांची भरती करण्यात आली होती. जेव्हा जमीन व्यवहार झाला, तेव्हा त्यांना नियमित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.