अंमलबजावणी संचालनालयाने (ED) स्मार्टफोन निर्माता Xiaomi वर कर चोरी प्रकरणात आपली पकड घट्ट करत शनिवारी या प्रकरणी मोठी कारवाई केली. ED ने Xiaomi India Pvt Ltd चे बँक खात्यांमध्ये जमा केलेले 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने केलेल्या कर चोरी प्रकरणात ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) अंतर्गत ही कारवाई केली आहे.
कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपास सुरू केलेल्या ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली. ED ने सांगितले की, 2014 मध्ये भारतात काम सुरू केलेल्या Xiaomi ने 'रॉयल्टी' म्हणून तीन परदेशात असलेल्या संस्थांना ज्यात एक Xiaomi समूहाची घटक कंपनीचा देखील समावेश आहे त्यांना 5,551.3 कोटी रुपये पाठवले. ईडीने आरोप केला आहे की, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस-बेस्ड असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे
ज्यांना एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, त्या परदेशी कंपन्यांकडून Xiaomi India ने अ कोणतीही सेवा घेतलेली नाही. कंपनीने ही रक्कम रॉयल्टीच्या स्वरूपात परदेशात पाठवली जी FEMA च्या कलम 4 चे उल्लंघन करते. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती देखील दिली, अशी माहिती समोर आली आहे.
एजन्सी किमान फेब्रुवारीपासून कंपनीची चौकशी करत होती आणि अलीकडेच Xiaomi चे माजी भारतीय व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांना त्यांच्या अधिकार्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. ईडीने केलेली कारवाई ही आयकर (आयटी) विभागाने केलेल्या तपासानंतर केली आहे, ज्यांनी यापूर्वी या कंपन्यांवर छापे टाकले होते. या कारवाईच्या दरम्यान कर चोरीच्या आरोपांना दुजोरा देणारा डेटा जप्त केल्याचा दावा कर अधिकाऱ्यांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.