Atishi: "ईडी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजेच ईडी," आतिशींचा सुषमा स्वराज यांच्या कन्येसह भाजपवर हल्लाबोल

Bansuri Swaraj: नवी दिल्लीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार आणि वकील बन्सुरी स्वराज ईडीच्या बाजूने न्यायालयात उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही, असा आरोप आतिशी यांनी केला.
Atishi Marlena On Bansuri Swaraj
Atishi Marlena On Bansuri SwarajEsakal
Updated on

Atishi Marlena On Bansuri Swaraj And ED:

आपच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी मर्लेना यांनी बुधवारी आरोप केला की, भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार बन्सुरी स्वराज यांनी मंगळवारी आप खासदार संजय सिंह यांच्याविरुद्धच्या खटल्यात अंमलबजावणी संचालनालयाचे प्रतिनिधित्व केले होते. आणि यावरुन स्पष्ट होते की ईडी आणि भाजप एकच आहेत.

नवी दिल्लीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार आणि वकील बन्सुरी स्वराज ईडीच्या बाजूने न्यायालयात उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही, असा आरोप आतिशी यांनी केला.

हा आरोप करताना मर्लेना यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये मर्लेना म्हणाल्या, "कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ईडीने नवी दिल्लीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार वकील बन्सुरी स्वराज यांचे नाव चुकीचे कारण देत काढून टाकले; परंतु बन्सुरी स्वराज फक्त एकदाच नाही तर, त्या वारंवार ईडीच्या बाजूने न्यायालयात हजर झाल्या आहेत."

त्या पुढे म्हणाल्या, "एक ऑर्डर बदलल्याने सत्य लपत नाही. आणि प्रत्येकाला माहित आहे, ईडी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजेच ईडी आहे."

Atishi Marlena On Bansuri Swaraj
Ramdev Baba: कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

यावेळी 'आप'च्या मंत्री आतिशी मर्लेना यांनी स्पेशल लीव पिटीशनची एक प्रत देखील एक्सवर शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रतिवादींपैकी एक म्हणून बन्सुरी स्वराज यांचे नाव आहे.

केंद्र सरकारवर निशाणा साधत आप नेत्या म्हणाल्या, "आता भाजप नेते केंद्र सरकारच्या तथाकथित 'स्वतंत्र' एजन्सीसाठी न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.

यापूर्वी, बन्सुरी स्वराज यांच्यावर जोरदार टीका करताना, आतिशी म्हणाल्या की, भाजप नेत्या, ज्या एक वकील देखील आहेत. त्या बदनाम क्रिकेट प्रशासक आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्त, ललित मोदी यांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप आहेत.

Atishi Marlena On Bansuri Swaraj
Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींचे मारेकरी भारतातूनही मुक्त; मायदेशी श्रीलंकेकडं रवानगी

दिल्लीतील एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आप नेत्या म्हणाल्या, "भाजपने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या जागी अशा व्यक्तीला उमेदवारी दिली आहे ज्यांनी देशविरोधी लोकांची न्यायालयात बाजू मांडली आहे. बन्सुरी स्वराज, एक वकील आहेत, ज्यांनी देशातून कोट्यवधी घेऊन पळून गेल्याचा आरोप असलेल्या ललित मोदीसाठी न्यायालयात बाजू मांडली आहे.

मर्लेना यांनी पुढे दावा केला की, बन्सुरी यांनी मणिपूरमध्ये गेल्या वर्षी दोन आदिवासी महिलांचा नग्न अवस्थेत व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी मणिपूर सरकारची बाजू मांडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.