अंमलबजावणी संचनालयात (ED) कार्यरत असलेले अधिकारी आलोक कुमार रंजन यांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. साहिबाबाद रेल्वे स्थानकाजवळ अलोक कुमार रंजन यांनी आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, कथित भ्रष्टाचार प्रकरणात आलोक यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू होती.
सहाय्यक संचालक संदीप सिंग यांना नुकतेच सीबीआयने २० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये आलोक कुमार रंजन यांचेही नाव होते. अटकेच्या भीतीने त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीबीआयशिवाय अंमलबजावणी संचालनालयानेही आलोक रंजनविरोधात गुन्हा दाखल केला होता.
भ्रष्टाचार प्रकरणात आलोक रंजन यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अटकेच्या भीतीने ते चिंतेत होते. सध्या तरी पोलिसांनी या संपूर्ण घटनेबाबत कोणतेही औपचारिक वक्तव्य जारी केलेले नाही.
आलोक रंजन यांच्या आत्महत्येचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी ईडीने सहाय्यक संचालक संदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली ईडीने एका ज्वेलर्सच्या घरावर छापा टाकला आणि त्याच्या मुलाला अटक करण्याची धमकी दिली.
संदीप सिंग यांनी मुलाला सोडण्यासाठी ज्वेलर्सकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर ज्वेलर्सने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली.
दिल्लीतील लाजपत नगर येथून पैसे घेताना संदीप सिंग यांना सीबीआयने रंगेहात पकडले होते. सीबीआयने संदीपविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आणि निलंबित करण्यात आले.
सीबीआयने संदीप सिंग यांची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी ईडीचे अधिकारी आलोक रंजन यांचे नाव घेतले. संदीप यांच्या जबानीच्या आधारे सीबीआयने आलोक रंजनल यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर 50 लाखांची लाच घेतल्याचा आरोपही होता.
या सर्व घडामोडी घडत असताना आता आलोक रंजन यांचा मृतदेह रेल्वे रुळांवरून सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.