'आप'चे मंत्री EDच्या रडारवर; अटकेनंतर सत्येंद्र जैन यांच्यावर कारवाई

आज सकाळी पहाटे त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.
Satendra Jain
Satendra JainSakal
Updated on

नवी दिल्ली : आपचे मंत्री सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर आज पहाटे ईडीने कारवाई केली आहे. ईडीने कोलकत्त्याच्या एका कंपनीच्या बाबतीत हवाला व्यवहारासंबंधी त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान त्यांना मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

(ED Raid On Satyendra Jain)

यासंदर्भातील भाकीत आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी याअगोदरच केले होते. जैन यांना अटक होणार आहे असं ते म्हणाले होते आणि त्यांना मागच्या आठवड्यात अटक झाली होती. अटकेनंतर आठ दिवसांतच त्यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

Satendra Jain
...तर शेवटच्या पाच मिनिटांत निवडणूक मारणार; बच्चू कडूंचा इशारा

जैन यांच्यावर कोलकात्यातील कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराचा आरोप आहे. २०१५ ते मे २०१७ या कालावधीत, म्हणजे ते मंत्री असतानाच्या काळातच व्यवहार झाल्याचे त्यांच्यावरील आरोपपत्रात म्हटले आहे. बनावट कंपन्यांचा आधार घेत दिल्लीहून कोलकाता येथे पैसे कसे पाठवले गेले, याबाबत ईडीने पुराव्यासह माहिती न्यायालयात सादर केली आहे. यापूर्वी एप्रिलमध्येही जैन यांच्या कुटुंबाची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि कंपन्यांची मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने जप्तीची कारवाई केली होती.

दरम्यान आपचे नेते केंद्र सरकारच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. आपने भाजपला दिल्लीत धुळीत मिसळल्याने भाजप आपचा बदला घेत आहे असा आरोप आपकडून होत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याआधीच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं भाकीत केलं होतं. त्यांचं भाकीत खरंही ठरलं आहे. यांच्या पाठोपाठ सिसोदिया यांचाही नंबर असल्याची बातमी खबऱ्यांनी केजरीवालांना दिली आहे. त्यामुळे आता केजरीवालांच्या भाकिताप्रमाणे सिसोदिया यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()