Delhi Liquor Scam : सिसोदियांनंतर CM चंद्रशेखर राव यांची मुलगी अडचणीत; ED नं बजावलं समन्स

Delhi Excise Case: ईडीनं 9 मार्चला कविता यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
K Kavitha Delhi Liquor Scam Case
K Kavitha Delhi Liquor Scam Caseesakal
Updated on
Summary

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

Delhi News: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam Case) मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यानंतर आता ईडीनं (ED) तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषदेच्या सदस्या कविता यांना समन्स बजावलंय.

ईडीनं 9 मार्चला कविता यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

K Kavitha Delhi Liquor Scam Case
DK Shivakumar : भाजपला धक्का बसणार? अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

कविता ह्या दक्षिण गटाच्या प्रतिनिधींपैकी एक आहेत. त्यांच्यावर आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. दक्षिण गटाचं प्रतिनिधीत्व अभिषेक बोईनापल्ली, अरुण पिल्लई आणि बुची बाबू यांनी केलं होतं.

K Kavitha Delhi Liquor Scam Case
Irina Viner : न्यायाधीशांवर टीका करणं भोवलं; 'या' Gymnastic प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी!

बोईनापल्ली यांनी नायर आणि त्यांचा सहकारी दिनेश अरोरा यांच्याशी संगनमतानं कट रचून 100 कोटींची लाच हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही चौकशी करण्यात आली होती. केंद्रीय एजन्सीनं त्यांना आम आदमी पक्षाच्या नेत्यांना दिलेल्या 100 कोटींच्या लाचेबाबत प्रश्न विचारले होते. सध्या सिसोदिया न्यायालयीन कोठडीमुळं तिहार तुरुंगात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.