ED : गांधी घराण्याचीही चौकशी करणारे संजय मिश्रा आहे तरी कोण? ज्यांच्यासाठी केंद्र सरकारही...

Sanjay Mishra
Sanjay Mishra
Updated on

- यश वाडेकर

संपूर्ण भारतातील राजकारण्यांना सध्या धास्ती आहे ती एकाच संस्थेची ती म्हणजे, EDची. ED च्या रडारवर आज कोण, ED ने कुठे धाड टाकली अश्या बातम्यांमुळे ED चर्चेत असते. पण आता ED नेत्या किंवा एखाद्या धाडीमुळे नव्हे तर ED प्रमुख संजय कुमार मिश्रा यांच्यामुळे चर्चेत आहे.

Sanjay Mishra
Sanjay Raut : 'शासन आपल्या दारी अन् आम्ही दिल्ली दरबारी'; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

केंद्राला मोठा झटका देत सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना दिलेली तिसरी मुदतवाढ "बेकायदेशीर" ठरवली. तसेच त्यांना 31 जुलैपर्यंत पद सोडण्यासाठी वेळ दिला.

संजय कुमार मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. 1984 च्या बॅचचे IRS अधिकारी संजय कुमार मिश्रा यांना ऑक्टोबर 2018 मध्ये EDचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मिश्रा, हे एक आर्थिक तज्ञ आहेत. त्यांनी आयकरमधील अनेक उच्च-स्तरीय प्रकरणांची चौकशी केली आहे.

ज्यामुळे त्यांची ईडी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, सीएनबीसीच्या म्हणण्यानुसार. नियुक्तीपूर्वी मिश्रा यांना दिल्लीत आयकर विभागाचे मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. संजय कुमार मिश्रा यांच्या देखरेखीखाली (ईडी)ने केवळ चार वर्षांत 65000 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येते.

पण संजय मिश्रा चर्चेत आले ते, मिश्रा यांच्या मुदतवाढी विरोधात दाखल झालेल्या याचिकांमुळे. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, जया ठाकूर आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मिश्रा यांच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या.

त्यावर कोर्टाने "मिश्रांची वाढीव मुदत 2021 च्या निकालाच्या आदेशाचे उल्लंघन करते' असं म्हटलं. हा केंद्र सरकारला कोर्टाने दिलेला झटका मानला जातोय. संजय कुमार मिश्रांनी अनेक हाय प्रोफाइल केसेस हाताळ्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED ही केंद्राची सर्वोच्च एजन्सी आहे जी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) ची अंमलबजावणी करते आणि मनी लाँडर आणि इतर मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करते. संजय मिश्रा यांच्या देखरेखीखाली केंद्रीय तपास यंत्रणेने काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांसारख्या अनेक उच्चभ्रू लोक आणि राजकारण्यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याविरुद्धही ईडी खटल्यांची चौकशी करत आहे.

31 जुलैपर्यंत त्यांना पद सोडण्यासाठी वेळ आहे त्यामुळे मिश्रा जाण्याआधी कोणावर कारवाई करतात, येणाऱ्या काळात ED च्या प्रमुख पदी कोण येत. मिश्रांनंतर ED चा दबदबा कमी होईल का ? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतीलच पण राजकारण्यांना घाम फोडणारे संजय कुमार मिश्रा लक्षात राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.