Tunnel Collapse: 40 कामगारांना वाचवणार 3 फूटांचं पाईप; जाणून घ्या काय आहे रेस्क्यू प्लॅन?

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सुरु करण्यात आलेले ऑपरेशन तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे
Tunnel Collapse
Tunnel Collapse
Updated on

देहरादून- उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सुरु करण्यात आलेले ऑपरेशन तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. अद्याप, मजुरांना बोगद्याबाहेर काढण्यात यश आलेलं नाही. यमुनोत्री हायवेवर धरासू-बडकोटच्या बोगद्यामध्ये मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ९०० एमएम पाईप बोगद्यातील ढिगाऱ्याच्या आतमध्ये सोडले जाणार आहेत.

पाईप बोगद्यात सोडणार

तीन फूट पाईप ढिगाऱ्याच्या आत सोडून यातून मजुरांना बाहेर काढले जाणार आहे. आज सकाळी पाईप लादलेले ट्रक घटनास्थळी पोहोचले होते. तसेच ड्रिलिंग मशीन देखील घटनास्थळी आणण्यात आली आहे. बोगद्यात पडलेल्या अवशेषांच्या ढिगाऱ्यातून पाईप आडवे सोडण्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी ड्रिलिंग मशिनच्या माध्यमातून छिद्र पाडले जाईल. पाईप आतमध्ये पोहोचल्यास याच्यामधून मजूर बाहेर येऊ शकतील.

Tunnel Collapse
देवभूमी उत्तराखंड

मंगळवारी रात्री ऑपरेशन पूर्ण होणार!

ऑपरेशनसाठी लागणारे सर्व साहित्य आणि मशिनरी घटनास्थळी आणण्यात आली आहे. उत्तरकाशीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अर्पन यादूवंशी म्हणाले की, ६० मीटर अंतरापर्यंत अवशेषांचे ढिगारे पडले आहेत. त्यातील आतापर्यंत २० मीटरपेक्षा जास्त भागातील ढिगारा साफ करण्यात आला आहे. सर्व मजुरांना मंगळवारच्या रात्रीपर्यंत काढले जाण्याची शक्यता आहे. ते एएनआयशी बोलत होते.

मजूर सुरक्षित

जड उत्खनन करणारे मशिन ऑपरेशन दरम्यान वापरले जात आहेत. काँक्रिटचे ढीग, कचरा हटवण्यासाठी आरओसी मशिन वापरल्या जात आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत. काही मजुरांचे कुटुंबीय अपघातस्थळी पोहोचले आहेत. (Efforts to rescue 40 workers trapped inside the Silkyara Barkot tunnel in Uttarkashi Uttarakhand are underway installing 900 mm pipes inside the tunnel to trapped workers come out)

Tunnel Collapse
Uttarakhand: उत्तराखंड मधील उद्योजकांचे सहभागीदार उत्तराखंड राज्य असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शो मध्ये विश्वास

मजूरांशी संपर्क

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने सांगितलं की, मंगळवारी सकाळी बचावपथकाचा आणि बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा रेडिओच्या माध्यमातून संपर्क झाला आहे. एका आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, बोगद्यातमध्ये पाच ते सहा दिवस पुरु शकेल इतका ऑक्शिजन आहे.

लाईफलाईन

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न आणि पाणी पुरवलं जात आहे. बोगद्यामध्ये पाण्याच्या पुरवठ्यासाठी असलेली पाईपलाईन सध्या लाईफलाईनचं काम करत आहे. याच पाईपलाईनच्या माध्यमातून मजुरांना पाणी आणि अन्न पुरवलं जात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा देखील या माध्यमातून होत आहे. मजुरांशी संपर्क झाला असल्याने त्यांना हिंमत दिली जात आहे.

कसा झाला अपघात?

सिलक्यारा आणि दंदालगाव दरम्यान बांधला जात असलेल्या बोगद्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला. संपूर्ण बोगद्याची लांबी ४.५ किलोमीटर आहे. यापैकी २३४० मीटर सिलक्याराच्या बाजूने आणि १७५० मीटर दंदालगावच्या बाजूने बांधून पूर्ण झाला आहे. ४४१ मीटरचा अपूर्ण राहिलेला बोगदा बांधण्याचे काम सुरु असताना काही भाग कोसळून हा अपघात झाला.सिलक्याराच्या बाजूने २०० मीटर आत ही घटना झाल्याचे सांगितले जाते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.