सत्तेचा अहंकार देशाला घातक : सत्यपाल मलिक

दिल्लीत संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार वितरण
Distribution Sant Namdev National Award Delhi
Distribution Sant Namdev National Award Delhi sakal
Updated on

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजून घ्या, आंदोलन थांबायला पाहिजे असे सांगितले होते. परंतु सत्तेमुळे आलेला अहंकार वाईट ठरतो की, त्यात ७०० शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. त्याची चर्चाही होत नाही. मी मात्र सत्याच्या बाजूने राहीन, उर्वरित आयुष्यात शेतकऱ्यांसाठीच काम करेन, अशी भावना मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केली.

पुण्यातील सरहद संस्थेतर्फे मलिक यांना १७ व्या तर ‘रॉ‘ चे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलत यांना १६ व्या संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली शिख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीतसिंग कालका, मुख्य पाहुणे म्हणून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. मलिक यांना डॉ. अब्दुल्ला, तर दुलत यांना कालका यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश, संत नामदेव यांची प्रतिमा आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून विजय धर, सतसिंग मोखा, सुखजिंदर सिंग बावा, अरुण नेवसेकर, सुरेंद्र वाधवा, डॉ. शैलेश पगारिया व्यासपीठावर होते. ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केले.

देशात केवळ द्वेषाचे राजकारण: अब्दुल्ला

डॉ. फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘या देशातून इंग्रज गेलेत. आता आम्ही स्वतंत्र आहोत. परंतु देशात केवळ द्वेषाचे राजकारण चालले आहे. एक दुसऱ्यासोबत लढवल्या जात आहे. आम्ही काय खायचे? काय घालायचे? हा प्रश्‍न उपस्थित का होतो. हा हिंदुस्थान असूच शकत नाही. महात्मा गांधींचा हिंदुस्थान हरवला आहे. तो पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न हवेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()