बिहार : पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कॉर्पिओ गाडी (Road Accident) पडली. या अपघातात कारमधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झालेत. ही घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील बयासी भागातील अनगढ गावात घडली. हा अपघात रात्री उशिरा म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. (Eight killed in road accident in Bihar)
अपघातातील सर्व जण लग्नाचे नाते निश्चित करून खापरा ताराबारी येथून किशनगंज जिल्ह्यातील नुनिया गावात परतत होते. याच दरम्यान हा अपघात (Road Accident) झाला. माहिती मिळताच पोलिस व मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य हाती घेतले. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले, असे बियासीच्या एसडीओ कुमारी तौसी यांनी सांगितले.
ही घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक स्कॉर्पिओ गाडी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. भरधाव वळणावर स्कॉर्पिओ अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. सर्व मृत (killed) किशनगंज जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्रमुखांनी सांगितले. वाहनात आणखी एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळत आहे. गोताखोरांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.