Building in Lucknow's Transport Nagar area collapsed:
लखनौ येथे एक बहुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कमीत कमी आठ जण मृत्युमुखी पडले असून, अन्य वीस जण जखमी झाले आहेत. या जखमींवर येथील लोकबंधू रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. या इमारतीची डागडुजी सुरू असताना ही दुर्घटना घडली.
इमारतीमध्ये अनेक औषध कंपन्यांचे गोदाम होते. यामध्ये अनेक कामगार होते. आतापर्यंत २८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच चार एनडीआरएफ टीम, सहा एसडीआरएफ टीम आणि पाच अग्निशन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या होत्या. रात्रभर ऑपरेशन सुरु होतं.