नवी दिल्ली - एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचलेली एक आठ वर्षांची मुलगी रोज ८-९ किलोमीटर चालली. तिची आवड पाहून ट्रेकर्स आश्चर्यचकित झाले आहेत. आठ वर्षांची वीरा वाधवानी हिने तिची आई, प्रसिद्ध जलतरणपटू स्नेह वाधवानी आणि गाईड-ट्रिप लीडर संजीव राय यांच्यासमवेत ३ मार्च रोजी ट्रेकला सुरुवात केली होती. त्यानंतर ते १२ मार्च रोजी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचले.
वीराच्या उत्साहाचं रहस्य म्हणजे ती आपल्या आईसोबत नियमितपणे ट्रेकिंग करत असते. वीरा लहान असल्यापासून तिची आई तिला आपल्या हायकिंग करिअरमध्ये ट्रेकवर घेऊन जायची. याच कारणामुळे वीराला डोंगरदऱ्यांची आवड निर्माण झाली. एवढ्या लहान वयात वीराची ऊर्जा आणि आवड पाहून सर्व सहकारी ट्रेकर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
वीराची आई स्नेह म्हणाली की तिला नेहमीच तंबूत राहणे आवडते. ती स्लीपिंग बॅगमध्ये शांतपणे झोपते. तिला निसर्गात आपल्या घरासारखी फिलींग वाटते. कुठल्याही त्रासाशिवाय मुलीसोबत ट्रेकिंग करणं सोपं आणि आनंददायी होतं.
वीराने चालायला सुरुवात केल्यापासून ती आई आणि तिच्या मैत्रिणींसोबत ट्रेकला जायला उत्सुक होती. "आमच्या सर्व सुट्ट्यांमध्ये नेहमीच हायक ट्रेकचा समावेश असतो. वीराला जास्त अंतर चालायला कधीच भीती वाटली नाही. लांबचे अंतर कापण्यासाठी तिच्यावर नेहमीच विश्वास ठेवता येत असे. स्नेह म्हणाली की, तिला आपल्या मुलीचा अभिमान आहे.
वीराच्या आईने सांगितले की, आपल्या मुलीला एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीसाठी तिने विशेष काळजी घेतली. मी एक पालक म्हणून सांगते की, मुलं अद्भुत असतात. पती-पत्नी आम्ही दोघेही खेळाडू वीराचे वडील आणि कसोटीपटू विजय दहिया यांच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. ते म्हणतात की वीराने मला जे हवे होते ते साध्य करून दाखवले. विजय सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.