भारतातला सगळ्यात छोटा मिलेनियर! चार महिन्यांचं बाळ झालं अब्जाधीश; अचानक कुठून आले एवढे पैसे?

नवी दिल्लीः मागच्या वर्षी १० नोव्हेंबर २०२३ रोजी जन्मलेला एक मुलगा आता चक्क अब्जाधीश झाला आहे. बाळाचं नाव आहे एकाग्रह रोहन मुर्ती. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार एकाग्रह हा भारतातला सगळ्यात कमी वयाचा अब्जाधीश ठरला आहे.
भारतातला सगळ्यात छोटा मिलेनियर! चार महिन्यांचं बाळ झालं अब्जाधीश; अचानक कुठून आले एवढे पैसे?
Updated on

एकाग्रहच्या आजोबांनी त्यांच्या कंपनीतील आपल्या वाट्याचे काही शेअर ट्रान्स्फर केले आहेत. एकाग्रहच्या आजोबांचं नाव नारायण मूर्ती आहे. इन्फोसिस कंपनीचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी आपल्या नातवाला कंपनीचे २४० कोटी रुपये रुपये किंमतीचे शेअर्स गिफ्ट केले आहेत.

भारतातला सगळ्यात छोटा मिलेनियर! चार महिन्यांचं बाळ झालं अब्जाधीश; अचानक कुठून आले एवढे पैसे?
MLA Disqualification Case: बंडखोरांना दणका! 6 काँग्रेस आमदारांच्या निलंबन स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

एकाग्रह रोहन मूर्ती या बाळाकडे आता इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण शेअर्सच्या ०.०४ टक्के इतके आहेत. एका एक्स्चेंज फाईलिंगच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे. या ट्रान्स्फर केलेल्या शेअर्सनंतर नारायण मूर्ती यांच्याजवळ कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी ०.३६ टक्के शेअर्स शिल्लक आहेत. म्हणजेच १.५१ कोटी शेअर्स शिल्लक आहेत.

भारतातला सगळ्यात छोटा मिलेनियर! चार महिन्यांचं बाळ झालं अब्जाधीश; अचानक कुठून आले एवढे पैसे?
CSK vs RCB Match Tickets Booking : उद्घाटनाच्या सामन्याची तिकीट विक्री झाली सुरू, जाणून घ्या कसं करायचं ऑनलाईन बुकिंग

इन्फोसिस कंपनीची सुरुवात १९८१ मध्ये २५० डॉलरने झाली होती. आज ही कंपनी भारतातल्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने कार्पोरेट गव्हर्नंन्स आणि संपत्ती निर्मितीचं लोकशाहीकरण करण्यासाठी मोठं काम केलं. सुधा मूर्ती यांनीही कंपनीला मोठं करण्यात योगदान दिलं. नारायण मूर्तींनी नातवाच्या नावावर शेअर ट्रान्स्फर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()