नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे गटाकडून केंद्रीय पातळीवर वर्चस्वाची लढाई लढली जात आहे. त्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण शिंदे गटानं सादर केलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयानं काही बदल सुचवलेत. त्यामुळं हे पत्र पुन्हा एकदा सादर करावं लागणार आहे. (Eknath Shinde group will have to give letter again to Lok Sabha Secretariat)
जे १२ खासदार आमच्यासोबत आहेत म्हणून त्यांना एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना तसं अधिकृत पत्र जाणं गरजेचं आहे. कालपासून याबाबत चर्चा सुरु होती की, बारा खासदार सोबत आहेत त्यांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाईल. आधीची वेळ सकाळी साडेदहा वाजता ठरली होती. पण हे पत्र अधिकृरित्या दिल्याचं अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.
मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या नावानं हे पत्र देण्याची सूचना लोकसभा सचिवालयानं शिंदे गटाला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कारण लोकसभेत शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत आहेत. ते शिंदे गटासोबत नाहीत. त्यामुळं नवीन गटनेता निवडण्याच्या हालचाली सुरु आहेत. राहुल शेवाळेंना गटनेतेपद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्याआधी जे पत्र द्यायचं आहे ते चीफ व्हिपच्या नावानं देण्याची गरज आहे. पण शिवसेनेनं गवळी यांना हटवून खासदार राजन विचारे यांनी चीफ व्हीपपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळं नवा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून लोकसभा सचिवालयानं ही सूचना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.