Sanjay Raut on Eknath Shinde
Sanjay Raut on Eknath Shindeesakal

Eknath Shinde: "एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात शाहांना दिल्लीत भेटले"; कुणी केली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत चौकशीची मागणी?

Sanjay Raut on Eknath Shinde : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यामध्ये सामिल आहेत, यामुळे अतिरेकी देखील यापासून प्रेरणा घेऊ शकतात. या काळात दाऊद किती वेळा देशात आला असेल, याची माहिती मिळालेली नाही, परंतु या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची गंभीरतेने चौकशी होणे आवश्यक आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Published on

एकनाथ शिंदे यांनी मौलवीच्या वेशात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेट घेतली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. संजय राऊत यांनी या आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी हे देखील म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

रंगभूमीच्या परंपरेचा उल्लेख-

संजय राऊत यांनी आपल्या विधानामध्ये महाराष्ट्राच्या रंगभूमीची मोठी परंपरा आहे, असे सांगितले. त्यांनी विष्णूदास भावे यांच्या योगदानाचा उल्लेख करताना बारामतीचे नवीन विष्णूदास भावे निर्माण झाल्याचे म्हटले. परंतु, त्यांच्या मते प्रश्न रंगभूमीचा नाही, तर विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न-

राऊत म्हणाले की, कोणताही माणूस बनावट नावाने आणि वेश पालटून विमानतळावर प्रवेश करू शकतो, यावरून राष्ट्रीय सुरक्षेशी मोठा खेळ झाला आहे. ते म्हणाले, “या देशाचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामिल आहेत. याची प्रेरणा घेऊन अतिरेकी देखील घुसू शकतात. यांच्या काळात दाऊद किती वेळा आला असेल मला माहिती नाही.”

वेशांतराचे आरोप-

देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले होते की, सरकार पाडण्याच्या आधी ते दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते. राऊत यांनी असा आरोप केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मौलवीच्या वेशात गेले होते आणि अमित शाहांना भेटले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बनावट ओळखपत्र बनवले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशीची मागणी-

राऊत यांनी म्हटले की, या प्रकरणाची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत चौकशी झाली पाहिजे. आमदार खरेदी करण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपये वापरल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Sanjay Raut on Eknath Shinde
Pradeep Sharma: अँटिलिया अन् मनसुख हिरेन हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या पत्नीचा मुलींसह शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका -

संजय राऊत म्हणाले, विमानतळाच्या सुरक्षेची स्थिती खूपच खोकली असल्याचे दिसून येते. कोणताही माणूस बनावट नावाने, आपल्या स्वार्थासाठी वेश बदलून विमानतळावर घुसू शकतो. अशा परिस्थितीत तो देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटू शकतो, याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यामध्ये सामिल आहेत, यामुळे अतिरेकी देखील यापासून प्रेरणा घेऊ शकतात. या काळात दाऊद किती वेळा देशात आला असेल, याची माहिती मिळालेली नाही, परंतु या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची गंभीरतेने चौकशी होणे आवश्यक आहे.

परदेशात पळून गेलेल्यांनीही अशा प्रकारेच वेश बदलून आणि बनावट नावाने पळ काढला असेल. यामुळे अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा मिळू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले होते की, ते सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश बदलून फिरत होते. माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये मौलवीच्या वेशात गेले होते आणि अमित शहांना भेटले होते. त्यांना दाढी आहेच. मात्र ते मौलवीच्या वेशेत गेले होते. त्यांना ते शोभते देखील, असे संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut on Eknath Shinde
CJI DY Chandrachud: "किड्यांसारखे जीवन जगण्यास मजबूर..."; UPSC विद्यार्थ्याने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.