Telangana Election : ''केंद्राच्या सर्वेक्षणानुसार तेलंगण हे देशातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले राज्य'', के. कविता यांचं विधान

kcr
kcrESAKAL
Updated on

हैदराबाद : केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार, तेलंगण हे देशातील सर्वांत कमी भ्रष्टाचार असणारे राज्य असल्याचे प्रतिपादन येथील विधान परिषदेच्या सदस्या आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी केले.

त्याचप्रमाणे, राज्यात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करत ‘बीआरएस’ने राज्यात ९५ ते १०० जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्याचेही कविता यांनी सांगितले. येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘बीआरएस’ ही भारतीय जनता पक्षाची ‘बी-टीम’ असल्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे खंडन करताना त्या म्हणाल्या, ‘‘सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासहित अनेक नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांबाबत भाजप अचानक शांत कसा काय झाला, याबाबत आपल्याला जाणून घ्यायला आवडेल.’’

kcr
Sushma Andhare:सुषमा अंधारेंविरोधात पाटण्यात अब्रुनुकसानीची तक्रार नोंद, ललित पाटील प्रकरणात देसाईंवर केले होते आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, की गांधी यांनी कोणत्याही राज्यात प्रचाराला जाण्यापूर्वी व्यवस्थित गृहपाठ करून जाणे गरजेचे आहे. तसेच, गांधी हे नेते नसून, ते फक्त त्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत असतात, अशी टीका कविता यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

kcr
Sharad Pawar:'याला शरद पवारच जबाबदार'! पडळकरांनी वाचला पवारांच्या आरोपांचा पाढा, गोपीनाथ मुंडेंचांही केला उल्लेख

२०१४ ला राज्याची निर्मिती झाल्यापासून सलग दोन वेळा सत्तेत आल्यानंतर ‘बीआरएस’ने राज्यात केलेली कामगिरी सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘२०१४ मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सुमारे ६९ हजार कोटी रुपयांचा होता. तो आता साधारणपणे तीन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, २०१४ पासून राज्याच्या दरडोई उत्पन्नात तीन पट वाढ होऊन ते एक लाख २४ हजारांवरून तीन लाख १२ हजारांवर पोहोचले आहे.’’

‘‘सत्तेत आल्यास राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला १२ हजार ते १५ हजार इतका भाव दिला जाईल,’’ असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

त्याबाबत बोलताना कविता म्हणाल्या, की हा देशातील सर्वांत मोठा विनोद असून, काँग्रेस पक्ष राज्यात दीर्घकाळ सत्तेत होता, त्यावेळी तो पिकांना किमान आधारभूत किंमत देऊ शकला नाही.’’ त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून देण्यात येणारी आश्वासने निरर्थक असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.