नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाना विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक बदलले आहे. राज्यात आता १ ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होईल. यामुळे जम्मू काश्मीरमधील मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला असून आता हरियाना आणि जम्मू काश्मीरमधील मतमोजणी ८ ऑक्टोबरला होईल.