Electoral Bond: "सर्व उघड करणार..."; इलेक्टोरल बाँड्स प्रकरणावर प्रतिक्रिया निवडणूक आयोगाचे प्रमुख काय म्हणाले?

Electoral Bond: SBI ने इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. SBI चेअरमन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान 22217 इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यात आले आहेत.
Election Commission chief Rajiv Kumar
Election Commission chief Rajiv Kumar esakal
Updated on

Electoral Bond:

SBI ने इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. SBI चेअरमन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान 22217 इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यात आले आहेत. त्यापैकी 22030 कॅश करण्यात आले आहेत. एसबीआयच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आदेशानुसार इलेक्टोरल बाँड देणग्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी एसबीआयने निवडणूक आयोगाला देखील डेटा दिला होता. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग इलेक्टोरल बाँडवरील सर्व तपशील वेळेत जाहीर करेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरल बाँड्सचे सर्व तपशील सादर केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला डेटा देण्यास सांगितले होते, त्यांनी (एसबीआय) काल (१२ मार्च) वेळेवर डेटा प्रदान केला आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग नेहमीच पारदर्शकतेच्या बाजूने राहिला आहे. मी जाऊन डेटा पाहीन आणि वेळेवर डेटा प्रकाशित करेन.

Election Commission chief Rajiv Kumar
Nepal PM Pushpa Kamal Dahal: कोण आहेत नेपाळचे PM पुष्प कमल दहल? 15 महिन्यात तिसऱ्यांदा जिंकला विश्वासदर्शक ठराव!

लोकसभा निवडणुकीसाठी आयोग पूर्णपणे सज्ज -

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्याबाबत सीईसी राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि देशात निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि लोकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. निवडणूक घेण्यास आमची पूर्ण तयारी आहे.

Election Commission chief Rajiv Kumar
Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्डबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्या; राष्ट्रपतींकडं विनंती अर्ज दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.