यूपीसह 5 राज्यांमध्ये निवडणूक रॅली, रोड शोवरील बंदी वाढवली

300 लोक किंवा एकूण क्षमतेच्या 50 टक्के अशा ठिकाणी सभा घेता येणार आहेत.
Rally
RallySakal
Updated on

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh Assembly Election 2022 ) पाच राज्यातील राजकीय रॅली (Political Rally) आणि रोड शो (Road Show) वरील बंदी 22 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल आहे. याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून 15 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती.

मात्र, छोट्या आणि इनडोअर सभांबाबत निवडणूक आयोगाकडून दिलासा देण्यात आला आहे. या रॅलींमध्ये 300 किंवा उपस्थित जागेच्या 50 टक्क्यांपर्यंत सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सूचना दिल्या आहेत की, या बैठकीदरम्यान कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच 8 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या निवडणुकांबाबत सर्वसमावेशक 16 कलमी मार्गदर्शक तत्त्वेही पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Rally
पुण्यात MPSC उमेदवाराची आत्महत्या

निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारीपूर्वी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, परिस्थिती सुधारल्यास त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता याबाबत आयोगाने आदेश जारी केला आहे. (Election Commission bans Poll Rallies & Roadshows in Poll-bound States Till 22nd January)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.