Electoral Bonds: निवडणूक रोख्यांसंदर्भातील नवीन माहिती आली समोर; आयोगाने वेबसाईटवर केली अपलोड

fresh electoral bonds data : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांसंदर्भात अपडेटेड माहिती जाहीर करण्यात आली आहे.
Election Commission
Election Commission
Updated on

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांसंदर्भात अपडेटेड माहिती जाहीर करण्यात आली आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बंद लिफाफ्यात ही माहिती सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती. माहिती सार्वजनिक करण्याच्या आदेशानंतर तो समोर आणण्यात आला आहे. (Election Commission makes fresh electoral bonds data public in website Supreme Court)

निवडणूक आयोगाने रविवारी काही नवी माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये निवडणूक रोख्यांसंदर्भातील डेटा समोर आणण्यात आला आहे. यात व्यक्तीने किंवा संस्थेने खरेदी केलेले रोखे आणि राजकीय पक्षांनी काढलेली रक्कम याची माहिती देण्यात आली आहे..

Election Commission
Electoral Bond: ‘गहाळ निवडणूक रोखे कुणाचे?’ भाजपाकडून करण्यात आली 'हफ्ता वसुली', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाकडे जूनपर्यंतचा वेळ मागितला होता. पण, सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाला फटकारत एका दिवसात माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्टेट बँकेने रोख्यासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला सादर केली होती. निवडणूक आयोगाने ही माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे.

निवडणूक आयोगाने याआधी निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती आपल्या वेवसाईटवर जाहीर केली होती. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये निवडणूक रोख्यांना असंविधानिक ठरवलं होतं. निवडणूक रोखे योजना ही २ जानेवारी २०१८ मध्ये सुरु करण्यात आली होती. काळा पैशांचा रोखण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

Election Commission
Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांचा IT रेडशी काय संबंध? अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलं स्पष्टीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांची माहिती सुप्रीम कोर्टामध्ये पेनड्राईव्हच्या माध्यमातून देण्यात आली होती. १५ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने ही माहिती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली होती. तसेच ही माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ही माहिती https://www.eci.gov.in/candidate-politicalparty या आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.