Electoral Bonds Data Disclose : अखेर इलेक्टोरल बाँडचा डेटा झाला उघड! BJP नंबर १ तर दोन नंबरला कोण? धक्कादायक खुलासा..

Electoral Bonds Data Disclose : भारतीय निवडणूक आयोगाने आज इलेक्टोरल बाँन्डसंबंधातील एसबीआयने दिलेला डेटा आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाने सांगितले की स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बॉन्डसंदर्भातील डेटा 12 मार्चला निवडणूक आयोगाकडे दिला होता.
Electoral Bonds
Electoral Bondsesakal
Updated on

Electoral Bonds Data Disclose : भारतीय निवडणूक आयोगाने आज इलेक्टोरल बाँन्डसंबंधातील एसबीआयने दिलेला डेटा आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाने सांगितले की स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बॉन्डसंदर्भातील डेटा 12 मार्चला निवडणूक आयोगाकडे दिला होता.

प्रेस नोटमध्ये निवडणूक आयोग म्हणते की, 'या प्रकरणी भारतीय निवडणूक आयोग हे सातत्याने आणि भर देऊन सांगत होते की आम्ही सर्व माहिती उघड करण्याच्या आणि पारदर्शता आणण्याच्या बाजूनेच आहोत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान देखील हीच भुमिका घेतली होती.'

जाहीर केलेल्या यादीत ग्रासिम इंडस्ट्रीज, परिमल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स, परिमल एन्टरप्राईजेस, मुथूट फायनान्स, पेगासेस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, वेदांता लिमिटेड, बजाज फायनान्स, भारती एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे.

Electoral Bonds
Petrol Price: लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त, कोणत्या शहरात कसे असतील दर?

कोणत्या पक्षाला किती रोखे?

भाजप : 8633

तृणमूल काँग्रेस : 3305

काँग्रेस : 3146

भारत राष्ट्र समिती : 1806

बीजू जनता दल : 830

द्रमुक : 648

वायएसआर काँग्रेस : 472

शिवसेना : 354

आप : 245

राष्ट्रीय जनता दल : 149

राष्ट्रवादी काँग्रेस : 116

जेडीएस : 75

समाजवादी पक्ष : 43

झारखंड मुक्ती मोर्चा : 45

जनसेवा पक्ष : 39

अण्णा द्रमुक : 38

नॅशनल कॉन्फरन्स : 4

तेलुगू देसम पक्ष : 3

सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली इलेक्टोरल बॉन्डची स्कीम रद्क केली होती. त्यानंतर एसबीआयला निवडणूक आयोगाला हा डेटा 6 मार्चपर्यंत सर्व डेटा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाला ही सर्व माहिती 13 मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्याचा आदेश देखील दिला होता.

मात्र 4 मार्चला एसबीआयने न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागितला होता. त्यांनी 30 जूनपर्यंत वेळ मागितला होता. यावेळी प्रत्येक पार्टीला दिलेले डोनेशन तपासून पाहणे वेळखाऊ असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने सोमवारी एसबीआयला डोनेशन तपासून पाहण्यास तुम्हाला सांगितलेले नाही.

न्यायालयाने एसबीआयला 12 एप्रिल 2019 नंतर बॉन्ड खरेदी करणाऱ्यांची नावे, तारीख आणि डोनेशन किती दिले, कोणत्या पक्षाला दिले याची माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने आज ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

Electoral Bonds
Ayodhya Ram Mandir: पैसे देऊन राम मंदिरात कोणतेही व्हीआयपी दर्शन नाही, ट्रस्टचे स्पष्टीकरण...

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार हा डेटा 12 एप्रिल 2019 पासून 15 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या खरेदी केलेल्या आणि वटवलेल्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आहे.

1 एप्रिल 2019 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत एकूण 22,217 बॉन्ड खरेदी करण्यात आले असे एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

(Marathi Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.