Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

Election Commission on why cant EVMs be hacked : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम संबंधी प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिले आहे.
Election Commission on If pagers can be exploded  why cant EVMs be hacked
Election Commission on If pagers can be exploded why cant EVMs be hacked
Updated on

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम संबंधी प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

लेबनॉनमध्ये काही दिवसांपूर्वी हिजबुल्लाच्या पेजरचे स्फोट झाले होते, मग इव्हीएम कसे हॅक होऊ शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर निवडणुक आयोगाने उत्तर दिले आहे.

त्यांनी सांगितले की, काही लोक पेजरचे स्फोट केले जाऊ शकतात, मग इव्हीएम हॅक कसे होऊ शकत नाही? असे प्रश्न उपस्थित करतात, अशा लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे की पेजर कनेक्टेड असते तर ईव्हीएम कनेक्टेड नसते. त्यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीनची पोलिंग एजंट्सच्या उपस्थितीत इतक्या स्तरांवर तपासणी केली जाते की त्यामध्ये काही गडबड असण्याची कुठलीच शक्याता उरत नाही.

मतदानाच्या आधी आणि मतदान झाल्यावर ईव्हीएमबद्दल कोणती काळजी घेतली जाते य़ाबद्दल निवडणुक आयोगाने विस्ताराने माहिती दिली. मुख्य निवडणूक आयिक्तांनी सांगितले की ईव्हीएमची सहा महिने आधी एफएलसी केली जाते. यामध्ये आधी त्यांची चेकिंग केली जाते, ईव्हीएम स्टोरेजमध्ये ठेवणे, त्याचे कमिशनिंग, बूथवर घेऊन जाण्यापासून मतदान झाल्यानंतर स्ट्राँगरूमध्ये घेऊन जाण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळी राजकीय पक्षाचे एजंट उपस्थित असतात.

Election Commission on If pagers can be exploded  why cant EVMs be hacked
Maharashtra Assembly Election 2024: पंकज भुजबळांनाच आमदारकी का? महायुतीने मराठा मतांचा नाद सोडून दिलाय का? 'असं' आहे राजकीय गणित

तीन स्तरीय सुरक्षा

त्यांनी सांगितले की मतदानाच्या आधी पाच ते सहा दिवस आधी ईव्हीएमची कमिशनिंग होते. यादरम्यान त्यामध्ये बॅटरी टाकली जाते आणि निवडणुक चिन्ह देखील लावले जातात. यानंतर ईव्हीएम सील केले जातात. इतकेच नाही तर ईव्हीएम बॅटरीवर देखील उमेदवारांच्या एजंट्सची स्वाक्षरी असते. कमिशनिंग नंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. त्यावर डबल लॉक लावले जाते. तीन लेयर सुरक्षा ठेवली जाते.

मतदानांसाठी जेव्हा ईव्हीएम पोलिंग बूथवर जाते तेव्ही हिच प्रक्रिया पुन्हा केली जाते. याची व्हिडीओग्राफी देखील करण्यात येते. कुठल्या नंबरचे मशीन कोणत्या बूथवर जाणार हे देखील सांगितले जाते. याचे रेकॉर्ड ठेवले जाते. बूथवर पोलिंग एजंट्सना मशीनमध्ये मतदान करून दाखवले जाते.

Election Commission on If pagers can be exploded  why cant EVMs be hacked
Election Commission Press Conference : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला! एका क्लिकवर वाचा सर्व अपडेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.