Election Commission: जात, धर्म अन् भाषेच्या आधारे मत मागणाऱ्यावर कारवाई होणार, लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोगाच्या कडक सूचना

Election Commission: लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या आहेत.
Election Commission
Election Commissionesakal
Updated on

Election Commission: लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या आहेत. जात, धर्म, भाषा आणि इतर अनेक मार्गांनी मते मागू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवार आणि स्टार प्रचारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

आयोगाने कोणते निर्देश जारी केले आहेत ते जाणून घेऊया.

  • जातीय भावनांच्या आधारावर अपील करू नये

  • विविध गटांमध्ये मतभेद वाढवणाऱ्या किंवा शत्रुत्व वाढवणाऱ्या अशा कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये

  • मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने खोटी विधाने किंवा निराधार आरोपांचा प्रचार करू नये. (Latest Marathi News)

  • वैयक्तिक हल्ले टाळले पाहिजेत आणि राजकीय भाषणात सभ्यता जपली पाहिजे.

  • निवडणूक प्रचारासाठी मंदिर/मशीद/चर्च/गुरुद्वारा किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये.

  • राजकीय पक्ष आणि उमेदवारांना महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या विरुद्ध मानली जाणारी कोणतीही कृती किंवा विधाने टाळावी

  • असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारमाध्यमांना देऊ नयेत.

  • सोशल मीडियावर संयम ठेवावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे टाळा.

  • आयोगाने सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता आणि कायदेशीर चौकटीत राहावे.

Election Commission
Water Survey: 485 पैकी फक्त 46 शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात; सरकारी सर्वेक्षणात धक्कादायक माहिती, पुण्यात परिस्थिती काय?

स्टार प्रचारक आणि उमेदवारांना सक्त सूचना-

निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक प्रचारादरम्यान शिष्टाचार राखण्यास सांगितले आहे. स्टार प्रचारक आणि उमेदवार, विशेषत: ज्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांच्यावर अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे.  राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी वस्तुस्थिती नसलेली विधाने करू नयेत किंवा मतदारांची दिशाभूल करू नये, असे आयोगाने म्हटले आहे.

सोशल मीडियावरही लक्ष ठेवा-

निवडणूक आयोगाने आपल्या सूचनांमध्ये सोशल मीडियावरील हालचालींचाही समावेश केला आहे. आयोगाने आपल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे की, प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करणाऱ्या किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या पोस्ट करू नयेत किंवा अशी सामग्री सोशल मीडियावर शेअर करू नये.

Election Commission
Gyanvapi Case: मुस्लिम पक्षाने ज्ञानवापीवर सर्वोच्च न्यायालयात केली 'अशी' मागणी, CJI चंद्रचूड यांनी लगेच दिला होकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()