राष्ट्रपती कसा निवडला जातो, खासदार-आमदारांच्या मताची किंमत काय?

Presidential Election 2022
Presidential Election 2022esakal
Updated on
Summary

निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे.

Presidential Election 2022 : निवडणूक आयोग (Election Commission) आज (गुरुवार) दुपारी 3 वाजता राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. तर, 17 जुलै 2017 रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती.

दरम्यान, 2017 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतं एनडीएच्या बाजूनं होती. म्हणजेच एकूण 4,880 मतदारांपैकी 4,109 आमदार आणि 771 खासदारांनी मतदान केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्वसामान्यांचा सहभाग नसतो, यात निवडून आलेले लोकप्रतिनिधीच भाग घेऊ शकतात.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या (MP) मतांच्या किमतीचं वेगळं गणित असतं. यामध्ये सर्व राज्यांच्या (विधानसभा) आमदारांच्या मतांचं मूल्य जोडलं जातं. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येनं भागलं जातं. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचं मूल्य असतं.

Presidential Election 2022
देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद
  • देशात एकूण 776 खासदार आहेत. (लोकसभा आणि राज्यसभा)

  • प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य 708 आहे.

  • देशात एकूण 4120 आमदार आहेत.

  • प्रत्येक राज्याच्या आमदाराच्या मताचं मूल्य वेगळं असतं. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचं मूल्य 208 आहे.

  • कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रपती होण्यासाठी 549441 मतं आवश्यक आहेत.

Presidential Election 2022
पाकिस्तानात मंदिराच्या पुजाऱ्यावर भ्याड हल्ला; जमावाकडून मूर्तींची तोडफोड

आमदाराच्या (MLA) बाबतीत.. ज्या राज्यात आमदार आहेत, तिथली लोकसंख्या पाहिली जाते. यासोबतच त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्याही विचारात घेतली जाते. मूल्य मोजण्यासाठी राज्याची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला 1000 नं भागलं जातं. आता जो काही आकडा उपलब्ध होईल, तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं मूल्य आहे.

Presidential Election 2022
PHOTO : शेवटी पोरीनं करुन दाखवलं! क्षमानं स्वतःशीच स्वतःचं लावलं लग्न

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळणं हे विजय निश्चित करत नाहीत. तर, मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचं वजन (Weightage) प्राप्त करणारा राष्ट्रपती होतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचं एकूण मूल्य 1098882 आहे. उमेदवाराला विजयासाठी 549441 मतं मिळणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.