इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय! 'हाल-शुगर'वर जोल्ले दाम्पत्याचा दबदबा; कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

कारखान्याचे मार्गदर्शक खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Halsiddhanath Sugar Factory Election
Halsiddhanath Sugar Factory Electionesakal
Updated on
Summary

यंदा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध होऊ घातली असल्याचे चित्र आहे.

निपाणी : निपाणीच्या राजकारणात एकेकाळी कळीचा मुद्दा ठरलेल्या हालसिद्धनाथ सहकारी (मल्टिस्टेट) साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक (Halsiddhanath Sugar Factory Election) पहिल्यांदाच बिनविरोध होण्याच्या टप्प्यात आली आहे.

बुधवारी (ता. ६) अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. मात्र, विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडच्या घोषणेची केवळ औपचारिकता राहिली आहे. गतवेळी विरोधकांनी बाजू काढली तरी तिसऱ्या गटाने उमेदवारी दाखल करून निवडणूक लागली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा विरोधकांनी निवडणुकीत तलवार म्यान केली आहे.

Halsiddhanath Sugar Factory Election
Maratha Reservation : तुमच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा तत्काळ वटहुकूम काढा; सतेज पाटलांचं सरकारलाच चॅलेंज

लोकसभा, विधानसभेपेक्षा अधिक चुरशीने होणाऱ्या निवडणुकीचे राजकीय सत्ताकेंद्र म्हणून हालसिध्दनाथ कारखान्याची ओळख आहे. पण, यंदा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध होऊ घातली असल्याचे चित्र आहे. या सगळ्या प्रक्रियेत विरोधकांची उदासिनता ही सत्ताधा-यांना अधिक बळ देणारी ठरली आहे.

आजवर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा विरोध ठरलेला असायचा. यावेळी मात्र निवडणुकीसाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने विरोध संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेनंतर अवघ्या चार महिन्यात कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने कारखाना सत्ताधा-यांच्या विरोधात विरोधक रान उठवतील का?, निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आव्हान देतील का? आणि तसे झाले तर सत्ताधारी विरोधकांना तोंड कसे देतील? याकडे भागाचे लक्ष लागले होते.

Halsiddhanath Sugar Factory Election
Ichalkaranji Bandh : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; इचलकरंजीत कडकडीत बंद, तब्बल 430 कोटींची उलाढाल ठप्प

पण, अर्ज भरण्याची मुदत संपली तरी विरोधक शांतच राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हालसिद्धनाथ कारखान्याची निवडणूक म्हटल्यावर आरोप-प्रत्यारोप, राजकीय ईर्ष्या ठरलेली असायची. जय-पराजय काही झालं तरी अस्तित्वासाठी लढाई लढून विरोधकांना शह दिला जात होता. पण, यावेळच्या निवडणुकीत विरोधकांनी कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्याने विरोधकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Halsiddhanath Sugar Factory Election
Maratha Reservation : संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं, तेव्हा फडणवीसांनीच मराठा समाजाला..; आरक्षणाबाबत महाडिकांचं मोठं वक्तव्य

याउलट कारखान्याचे मार्गदर्शक खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गतवेळी निवडणुकीत सर्व जागा निवडून आणल्या होत्या. यावेळी बिनविरोध निवडणूक होऊन जोल्ले गटाने निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील विरोधकांना शह दिला आहे.

यापूर्वी माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, आमदार गणेश हुक्केरी, कारखान्याचे माजी अध्यक्ष सुकुमार पाटील- बुदिहाळकर यांच्यासह प्रमुखांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली हालसिध्दनाथ कारखान्याची राजकीय सत्तासमिकरणे आखली जायची.

Halsiddhanath Sugar Factory Election
Government School : तब्बल 624 शाळांवर येणार गंडांतर? सरकारकडून 'या' शाळा बंद करण्याच्या हालचाली, विद्यार्थ्यांचं होणार नुकसान!

२०१८ च्या कारखाना निवडणुकीत सुकुमार पाटील - बुदिहाळकर हे खासदार जोल्ले यांना मिळाल्याने ते सध्या सत्ताधारी गटात आहेत. पण, विरोधकांच्या मागे असणा-या आणि समर्थक सभासद, मतदारांनी काय समजायचे? असा प्रश्न सामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.

सत्ताधारी गटाने खासदार जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दहा हजारांवर नवीन सभासद केले आहेत. यामुळे यंदाची निवडणूक विरोधकांसाठी कितीही मेहनत घेतली तरी सोपी नव्हती. तरीही विरोधकांचे भवितव्य आणि राजकीय अस्तित्वासाठी ती महत्त्वाची होती.

Halsiddhanath Sugar Factory Election
Maratha Reservation : 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, OBC आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही'

समेटाचे राजकारण

निपाणी तालुक्यात ११ व चिक्कोडी तालुक्यात पाच असे सोळा संचालक कारखान्यात होते. निपाणी मतदारसंघातील वर्चस्व आमदार व खासदार जोल्ले दाम्पत्याने राखले आहे. तर चिक्कोडी सदलगा मतदारसंघातही त्यांनी विरोधकांना शह दिला आहे. या तालुक्यातील बहुतांश सभासद असूनही दोन्ही मतदारसंघातील विरोधी पक्षाने कोणतीही भूमिका न घेतल्याने कार्यकर्त्यांतून नेत्यांच्या भूमिकेबद्दल संतप्त भावना आहेत. कारखान्यात जय-पराजयापेक्षा कार्यकर्त्यांची ईर्षा असूनही यावेळी विरोधी नेत्यांनी पुन्हा समेटाचे राजकारण केल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.