Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

State Elections Result 2024 : देशभरातील तेरा राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत स्थानिक सत्ताधारी पक्षांनी वर्चस्व दाखवले. भाजप आणि मित्र पक्षांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये बाजी मारली.
State Elections Result 2024
Amit Shah PM Modi Esakal
Updated on

नवी दिल्ली : देशभरातील तेरा प्रमुख राज्यांत विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये स्थानिक सत्ताधारी पक्षांची सरशी झाल्याचे दिसून आले. भाजप आणि मित्र पक्षांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये विजय मिळविला तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. विधानसभेच्या ४६ जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली होती. भाजप आणि मित्र पक्षांना २६ ठिकाणांवर यश मिळाले असून त्यांना नऊ जागांचा फायदा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.