Electoral Bond Case : इलेक्टोरल बाँडमधून राजकीय पक्षांना कोट्यवधी देणाऱ्यांमध्ये तीन कंपन्या बीफ एक्सपोर्टर; SBI डेटामधून मोठा खुलासा

SBI Electoral Bonds Data Marathi News : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राजकीय पक्षांना कोट्यावधी रुपयांची देणगी देणाऱ्या कंपन्यांविषयी धक्कादायक माहिती समोर येतेय.
Electoral Bonds
Electoral Bondsesakal
Updated on

SBI Electoral Bonds Data Marathi News : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राजकीय पक्षांना कोट्यावधी रुपयांची देणगी देणाऱ्या कंपन्यांविषयी धक्कादायक माहिती समोर येतेय. या कंपन्यांनी इलेक्टोरल बाँडच्या माध्यामातून भरभरून देणग्या दिल्या आहेत.

समोर आलेल्या डेटानुसार राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या कंपन्यांपैकी तीन कंपन्या या बीफ उद्योगातील आहेत. तसेच यामध्ये सर्वाधीक देणगी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिली आहे. ही कंपनी लॉटरी व्यवसायाशी संबंधीत असून याचे मालक सेंटियागो मार्टिन आहेत. सध्या मार्टिन कोट्याधीश आहेत पण एकाकाळी ते म्यानमारमध्ये मजूर म्हणून काम करत होते.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँडसंबंधीचा डेटा निवडणूक आयोगाला सोपवला आहे. त्यानंतर हा डेटा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केला आहे. या डेटामधून आता वेगवेगळे खुलासे होते आहेत. त्यानुसार अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि आयटी डिपार्टमेंटच्या धाडी पडल्यानंतर त्यांनी कोट्यावधी रुपयांचे इलेक्ट्रोल बाँड खरेदी केली.

बीफ एक्सपोर्ट करणारी अल्लान सन्स प्रायव्हेट लिमिटेड, फ्रीगोरीफिको अलाना प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्यूचर गेमिंग देखील या यादीत आहेत. या कंपन्यांच्या विरोधात छापेमारीची कारवाई झाली त्यानंतरच या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बाँड खरेदी करून राजकीय पक्षांना देणग्या दिल्या.

अल्लाना ग्रुपच्या चीन कंपन्यांनी एकूण सात कोटी देणगी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये कंपनीवर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली होती. यानंतर ९ महिन्यात अल्लाना ग्रुपने सात कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लाना कंपनी बीफ एक्सपोर्ट करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. अल्लान ग्रुपवर दोन हजार कोटींचा टॅक्स बुडवल्याचा आरोप आहे.

Electoral Bonds
Eknath Shinde : 'कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी नेहमीचं 'ते' वाक्य का टाळलं?', मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

एबीपी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुले २०१९ रोजी अल्लाना सन्सने इलेक्टोरल बाँडच्या स्वरुपात दोन कोटी रुपये दान केले होते. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी एक कोटी आणखी देणगी देण्यात आले . फ्रीगोरीफिको अल्लाना कंपनीने देखील २०१९ मध्ये ९ जुलै रोजी दोन कोटी आणि २२ जानेवारी २०२० रोजी दोन कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. अल्लाना ग्रुपशी संबधीत अल्लाना कोल्ट स्टोरेजने ९ जुलै २०१९ मध्ये एक कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.

या तिन्ही कंपन्या अल्लाना ग्रुपशी सलग्न आहेत मात्र यांचे डायरेक्टर हेड वेगवेगळे आहेत. अल्लाना कंपनी १८६५ साली स्थापन झाली आणि ही प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट करते.

Electoral Bonds
Viksit Bharat: भाजपला आमचे नंबर कसे मिळाले? यूएई पाकिस्तानी नागरिकांना 'विकसित भारत'चे मेसेज

फ्युचर गेमिंग आणि त्याचे मालक सँटियागो मार्टिन यांना ईडी आणि आयकर कारवाईचा सामना करावा लागला आहे. सिक्कीम सरकारच्या लॉटरी फसवणूक प्रकरणात सँटियागो मार्टिनचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात सिक्कीम सरकारचे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. सँटियागोची कंपनी केरळमध्ये सिक्कीम सरकारची लॉटरी विकत होती. या अंतर्गत, मे २०२३ मध्ये, सँटियागो मार्टिनच्या परिसरावर छापे टाकण्यात आले आणि ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता जप्त करण्यात आली. ईडीने सांगितले की मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत, कोईम्बतूर आणि चेन्नई येथे सँटियागो मार्टिन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सर्च ऑपरेशन चालवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.