Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्स ही जगातील सर्वात मोठी 'खंडणी योजना,' राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Narendra Modi: "पंतप्रधानांचा दावा आहे की ही योजना निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणली गेली होती, मग सर्वोच्च न्यायालयाने ती का रद्द केली?"
Electoral Bonds
Electoral BondsEsakal
Updated on

Rahul Gandhi On Electoral Bonds And PM Modi:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी आरोप केला की, इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वात मोठी "खंडणी योजना" आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "भ्रष्टाचाराचे चॅम्पियन" आहेत.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीच्या बाजूने जोरदार अंडरकरंट आहे. यावेळी भाजप फक्त 150 जागांपर्यंतच मजल मारू शकेल.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून गाझीपूरपर्यंत परिवर्तनाचे वारे वाहू लागतील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भव्य निरोप दिला जाईल, असे अखिलेश यादव यावेळी म्हणाले.

"लोकसभा निवडणुकीत एकही मत विभागले जाणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल," असेही अखिलेश यांनी नमूद केले.

आता रद्द करण्यात आलेल्या इलेक्टोरल बाँडवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांचा दावा आहे की ही योजना निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणली गेली होती, मग सर्वोच्च न्यायालयाने ती का रद्द केली?

"इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वात मोठी खंडणी योजना आहे. भारतातील उद्योगपतींना हे चांगलेच माहीत आहे. पंतप्रधानांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण पंतप्रधान हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे, " असे गांधी म्हणाले.

Electoral Bonds
Atal Bihari Vajpayee: किस्से निवडणुकीचे! सभेला गर्दी नसल्यामुळे अटलजी स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले

"जर तुम्हाला पारदर्शकता आणायची होती, तर भाजपला हजारो कोटी रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे का लपवली गेली?" ज्या कंपन्यांनी भाजपला देणग्या दिल्या त्याच्या तारखा का लपवल्या गेल्या, असा सवाल राहुल यांनी यावेळी केला.

"एका कंपनीला हजारो कोटींचे कंत्राट मिळाल्याचे आढळून आले आणि काही दिवसांनी त्या कंपनीने भाजपला देणगी दिली. एका फर्मची सीबीआय किंवा ईडी चौकशी झाली आणि 10-15 दिवसांनी, त्या फर्मने भाजपला देणगी दिली आणि ती चौकशी संपली," अशा घटना समोर आल्याचा आरोप राहुल यांनी केला.

Electoral Bonds
राज्य-मिती : ‘हिंदी पट्ट्यात’ मोदींची जादू कायम; मध्य प्रदेशात काय स्थिती?

उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेस युती करून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस 17 जागांवर लढत आहे तर सपा आणि इतर काही सहयोगी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशातील उर्वरित 63 जागांवर लढत आहेत. उत्तर प्रदेशातून लोकसभेत 80 खासदार जातात.

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून सुरू होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.