Electric Shock : तरुणी मदतीसाठी ओरडत होती, तडफडत होती; मात्र...

भरलेल्या पाण्यात तिची स्कूटी फसली
Bangalore Girl Death News
Bangalore Girl Death NewsBangalore Girl Death News
Updated on

Bangalore Girl Death News बेंगळुरू : मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यावेळी स्कूटीवरून पडून अखिला (२३) या तरुणीचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाला. ती शाळेत नोकरी करायची. ती तडफडत होती, मदतीसाठी ओरडत होती. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला.

अखिला स्कूटीवरून जात असताना पाण्यात स्कूटी फसली. यामुळे अखिला स्कूटीवरून उतरली आणि पायी चालायला लागली. अचानक खड्ड्यात पडल्याने ती घसरली. जवळच विजेचा खांब होता. अखिलाने आधारासाठी खांबाला पकडताच विजेचा धक्का (Electric Shock) बसला. ती मदतीसाठी आरडाओरडा करीत होती. परंतु, पाण्यात जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. यातच अखिलाचा मृत्यू झाला होता.

Bangalore Girl Death News
पूरपरिस्थितीची बैठक सुरू असताना झोपले कर्नाटकचे मंत्री; काँग्रेसने म्हटले...

नागरिकांनी अखिलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अर्ध्या तासापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधातील रोष अधिकच वाढला आहे. अखिलाच्या कुटुंबीयांनी शहराच्या वीज व्यवस्थापन मंडळासह स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन आणि बीबीएमपीवर ठपका ठेवला आहे.

अखिला पदवीधर होती. ती संगीत शाळेत काम करायची. भाऊ दिव्यांग आहे. त्यामुळे अखिला कुटुंबासाठी मुलासारखी होती. ती कुटुंबाची काळजी घेत होती, असे अखिलाची बहीण आशाने सांगितले. याप्रकरणी बीबीएमपीचे आयुक्त तुषार गिरीनाथ म्हणाले की, अखिलाचा मृत्यू दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Bangalore Girl Death News
Richa Chadha, Ali Fazal : रिचा, अली अडकणार विवाहबंधनात; लग्नाचा प्लॅन तयार

गेल्या काही महिन्यांत बेंगळुरूमध्ये (Bangalore) अशी चार प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी २१ वर्षीय वसंतचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तो रस्त्यावर लोंबकळत असलेल्या वायरच्या कचाट्यात आला होता. त्याचवेळी २२ वर्षीय युवक फुटपाथवरून चालला असताना खांबाजवळील तारेच्या कचाट्यात येऊन विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ३० वर्षीय व ४० वर्षीय पुरुषाचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

पुरावर राजकारण

बंगळुरूमधील पुरावरून राजकारण तीव्र झाले आहे. या संकटासाठी मुख्यमंत्री बोम्मई यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. पूर्वीच्या सरकारने योग्य व्यवस्था केली नाही. चुकीच्या कारभारामुळे लोक सखल भागात बेकायदेशीरपणे स्थायिक झाले. याशिवाय, ज्या भागात पाण्याच्या टाक्या लहान आहेत, ते ओव्हरफ्लो होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.