बर्न : स्वच्छ ऊर्जेसाठी सौर ऊर्जा ही भविष्याची गुरुकिल्ली आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठीही सौर ऊर्जेचा स्वीकार केला जात आहे. स्वीत्झर्लंडमधील ‘सन-वेज’ या स्टार्टअपने तर रेल्वे मार्गावरील रुळांच्या मधील जागेत सौर पॅनेल टाकण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
सन-वेज कंपनीच्या या नव्या उपक्रमात खास तयार केलेल्या रेल्वेगाडीद्वारे सौर पॅनेल हे लोहमार्गावरील मधल्या जागेत गालिच्याप्रमाणे अंथरले जातील. (देखभालीसाठी हे पॅनेल काढणेही शक्य होईल).
रात्री धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याने सौर पॅनेल बसविण्याचे काम रात्रीच करण्यात येईल. ही कल्पना नावीन्यपूर्ण असून ‘ग्रीनरेल आणि ‘बँकसेट’ या कंपन्यांशी सन-वेज’ला स्पर्धा करावी लागणार आहे. या कंपन्या अनुक्रमे इटली आणि इंग्लंडमधील आहेत. या संकल्पनेवर आधारित चाचण्याही कंपन्यांनी पूर्ण केल्या आहेत.
पण तरीही ‘सन-वेज’ही कामगिरी दोन कारणांसाठी अधिक उजवी ठरते. एक म्हणजे प्रमाणित आकाराची सौर पॅनेलचा वापर कंपनी करीत आहे. अन्य कंपन्या लहान आकारातील पॅनेलचा वापर करतात. जे लोहमार्गाला आधार देणाऱ्या क्रॉस्टीजवर टाकले जातात. मुख्य म्हणजे अन्य कंपन्यांप्रमाणे ‘सन-वेज’ सौर पॅनेल बसविण्याचे काम मानवी पद्धतीने करावे लागत नाही तर त्यासाठी खास रेल्वेगाडी आहे.
कंपनीने या संकल्पनेवर पश्चिम स्वित्झर्लंडमध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी पाच लाख ६० हजार डॉलरची गुंतवणूक केली आहे. या चाचणीत नुशाटेल या शहरात १४० फूट अंतरापर्यंतच्या मार्गावर ६० सौर पॅनेल हे साध्या रेल्वेच्या मदतीने बसविले जाणार आहेत.
ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विपणन व्यवस्थापक जोसेफ स्कुदेरी यांनी ‘सन-वेज’ची स्थापना केली आहे. रेल्वेसाठी प्रतीक्षा करीत रूळ न्याहळत असताना त्यांना तेथे सौर पॅनेल बसविण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी स्थापन केली. ही जागेचा वापर होत नसल्याने तेथे सौर पॅनेल बसविणार असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक बॅप्टिस्ट डॅनिशेर्ट म्हणाले.
प्रकल्पातील आव्हाने
रेल्वेकडून टाकलेले ढिगारे
पॅनेल आणि ग्रीडशी परस्पर जोडण्याऱ्या बिंदूमधील अंतर
रुळांवरील सौर पॅनेलचा उपयोग
सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी १००टक्के वीज थेट ग्रीडमध्ये जाऊन जवळपासच्या घरांना मिळणार
पण या पॅनेलमधून तयार होणारी सौर ऊर्जा ही त्यावरून जाणाऱ्या रेल्वेसाठी उपयोगात आणण्याचा विचार
डॅनिशेर्ट यांच्या मते पाच हजार किलोमीटर अंतरावरील ( स्वीस रेलरोडचे सध्याचे संपूर्ण जाळे) सौर रेल्वेद्वारे एक गिगावॉट वीज किंवा साडेसात लाख घरांना पुरेल एवढी वीज दरवर्षी निर्माण होईल
जगभरात दहा लाख किलोमीटरपेक्षा जास्त लोहमार्ग असल्याचे गृहित धरल्यास आणि प्रत्येक मार्गावर सौर पॅनेल बसविणे शक्य झाले नाही तरी वीज निर्मिती प्रचंड प्रमाणात निर्माण होऊ शकेल
लोहमार्गावर सौर पॅनेल बसविण्यासाठी शेतजमीन किंवा जंगलाखालील जमीन घेतली जाईल
पथदर्शी प्रकल्पासाठी
लोहमार्गावर सौर पॅनेल बसविण्याचे काम सध्या नेहमीच्या रेल्वेगाडीने करणार
या कामासाठी पुढे दोन डब्यांचा खास गाडीचा वापर होणार
एका डब्यात सौर पॅनेल ठेवले जाणार
दुसऱ्या डब्याद्वारे पॅनेल लोहमार्गावर बसविले जाणार
सौर पॅनेल अनिश्चित काळासाठी किंवा देखभालीची गरज पडेपर्यंत मार्गावर राहतील
देखभालीची आवश्यकता भासल्यास तीच रेल्वे मार्गावर जाऊन पॅनेल उचलणार
सौर पॅनेलच्या कामासाठी विशेष रेल्वेगाडीचा वापर केल्यास एका किलोमीटरला प्रतितास २५० मीटर याप्रमाणे कामाचा वेग वाढेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.