Elon Musk: इलॉन मस्क अन् पंतप्रधान मेलोनी करताएत डेट? रोमँटिक फोटो व्हायरल

Elon Musk Latest News: मस्क म्हणाले की, जॉर्जिया मेलोनी यांचं व्यक्तिमत्व हे कौतुक करणाऱ्यासारखं आहे. त्यांनी इटलीच्या पंतप्रधान म्हणून केलेलं काम अविश्वसनीय आहे. त्या अस्सल, इमानदार आणि खऱ्या आहेत. प्रत्येक राजकीय नेत्याकडे हे गुण नसतात.
Elon Musk: इलॉन मस्क अन् पंतप्रधान मेलोनी करताएत डेट? रोमँटिक फोटो व्हायरल
Updated on

Giorgia Meloni: अमेरिकेचे जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवून गेल्याचं दिसून येत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगचीच चर्चा रंगली आहे.

मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी मस्क यांनी मेलोनी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यांचा त्यांनी इमानदारी आणि सच्चाई असलेलं व्यक्तिमत्व, असा उल्लेख केला.

मेलोनी यांना अटलांटिक काऊन्सिल ग्लोबल सिटीझन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मस्क यांनी मेलोनी यांच्या सौंदर्याचंही कौतुक केलं. त्या बाहेरुन जितक्या सुंदर आहेत त्यापेक्षाही त्या आतून सुंदर आहेत, असं मस्क म्हणाले.

Elon Musk: इलॉन मस्क अन् पंतप्रधान मेलोनी करताएत डेट? रोमँटिक फोटो व्हायरल
Tirupati Laddu Row: तिरुपती लाडू प्रकरणात मोठी अपडेट! देवस्थानने 'या' संस्थेविरोधात दाखल केली तक्रार

काय म्हणाले इलॉन मस्क?

मस्क म्हणाले की, जॉर्जिया मेलोनी यांचं व्यक्तिमत्व हे कौतुक करणाऱ्यासारखं आहे. त्यांनी इटलीच्या पंतप्रधान म्हणून केलेलं काम अविश्वसनीय आहे. त्या अस्सल, इमानदार आणि खऱ्या आहेत. प्रत्येक राजकीय नेत्याकडे हे गुण नसतात.

दुसरीकडे मेलोनी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन मस्क यांचे आभार मानले. त्यानंतर टेस्ला फॅन क्लबने मस्क आणि मेलोनी यांचा फोटो एक्स अकाऊंटवर शेअर केला. त्याला कॅप्शन देताना म्हटलं की, तुम्हाला वाटतं का की ते डेट करत आहेत? त्यावर मस्क यांनी उत्तर देत आम्ही डेटिंग करत नसल्याचं म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.