नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी 'टेस्ला'चे (Tesla) सीईओ अॅलन मस्क यांची रॉकेट बनवणारी दुसरी कंपनी 'स्पेसेक्स'ने (Spacex) गुगलसोबत एक महत्वाची डील केली आहे. ही डील इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते त्यामुळे येत्या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Alan Musk company deals with Google Mukesh Ambani Geo will be hit)
स्पेसेक्स आणि गुगलमध्ये काय झाली डील
स्पेसेक्स आणि गुगलच्या डीलअंतर्गत स्पेसेक्स, गुगल डेटा सेंटर प्रॉपर्टिजच्या माध्यमातून स्टारलिंक ग्राउंड स्टेशनचा शोध घेणार आहे. स्पेसेक्सच्या १,५०० स्टारलिंक सॅटेलाईटला गुगल क्लाऊडच्या कक्षेमध्ये लॉन्च केलं जाईल. यामुळे ग्राहकांना विनाअडथळा हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होणार आहे. या पृथ्वीच्या कक्षेत जागतिक संघटनेसोबत सुरक्षित कनेक्शनच्या पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. आज याची खूप मोठी मागणी आहे.
मुकेश अंबानींनीसाठी आव्हान
गूगल आणि अॅलन मस्क यांच्या कंपनीतील सहकार्यामुळे मात्र रिलायन्स जिओच्या अडचणीत वाढ होऊ शकते. स्पेसेक्सची कंपनी स्टारलिंकने भारतात फेब्रुवारी महिन्यातच हायस्पीड इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकची प्री बुकिंग सुरु केली होती. स्टारलिंक प्रकल्पात कंपनी उपग्रहाच्या माध्यमातून काम करणार आहे. यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात इंटरनेट सेवा देणं सोपं होणार आहे. कंपनीचा दावा आहे की, स्टारलिंकचे जगभरात १०,००० हून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
तर दुसरीकडे रिलायन्स जिओबाबत सांगायचं झाल्यास जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे ४० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. सन २०१६ मध्ये जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. यानंतर सातत्याने कंपनीच्या ग्राहकांमध्ये वाढ होत गेली. इतकचं नव्हे तर जिओ आता 5G नेटवर्कमध्ये प्रवेश करणार आहे. भारतात जिओची प्रमुख प्रतिस्पर्धी एअरटेल कंपनी आहे.
जगातील दोन अब्जाधीश आहेत अंबानी आणि मस्क
अॅलन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्या दोघांच्या संपत्तीचा विचार केल्यास त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत दिसून येते. मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत तर मुकेश अंबानी या श्रीमंतांच्या यादीत सध्या १३व्या स्थानावर आहेत. अंबानींची सध्याची एकूण संपत्ती ७५ बिलियन डॉलर इतकी आहे. तर मस्क यांची संपत्ती १०० बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, अॅलन मस्क यांची संपत्ती १६४ बिलियन डॉलर इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.