नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि माक्रोब्लॉगिंक वेबसाईट ट्विटर आणि टेस्लाचा मालक इलॉन मस्क देखील आता पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो केलं आहे. मस्क जगातील केवळ १९५ लोकांनाच फॉलो करतात, यामध्ये आता मोदींचासाही समावेश झाला आहे. याची माहिती खुद्द इलॉन मस्क यांनीच ट्विटद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे मोदींविरोधातील बीबीसी डॉक्युमेंट्रीबाबतच्या पोस्टही ट्विटरहून डिलिट करण्यात आल्या आहेत. (Elon Musk is now following PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते आहेत. नुकतेच इलॉन मस्कचे सर्वाधिक फॉलोअर्स असल्याचं वृत्त आलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि गायक जस्टिन बीबर यांच्यासारख्या दिग्गजांनाही मस्क यांनी मागे टाकलं आहे. त्यामुळं आता ट्विटरवर इलॉन मस्कचे १३.३ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. बराक ओबामा २०२० पासून ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या लिस्टमध्ये टॉपवर आहेत.
टेस्ला भारतात दाखल होत असल्याचे संकेत?
भारताच्या इलेक्ट्रिक कारच्या बाजारात आता इलॉन मस्कची मालकी असलेली टेस्का कंपनी देखील दाखल होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वीही अशा चर्चा अनेकदा झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वीच मस्क भारतातील EV मार्केटमध्ये दाखल होणार होती, पण त्यांना टॅक्समध्ये मोठी सवलत हवी होती. पण मोदी सरकारनं टेस्लाच्या आयात शुल्कात कपात करण्यास नकार दिला होता. कारण टेस्लाच्या कार चीनमध्ये तयार होऊन भारतात दाखल होणार होत्या. पण वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी याला विरोध दर्शवत टेस्लाची कार निर्मितीचा प्रकल्प भारतातच व्हावा अशी अट त्यांनी घातली होती.
बीबीसी डॉक्युमेंट्रीसंबंधी पोस्ट काढल्या
दरम्यान, जानेवारीमध्ये भारतानं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना बीबीसी डॉक्युमेंट्रीसंबंधीच्या पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ट्विटरला आदेश देताना सरकारनं ५० ट्विट जे थेट या डॉक्युमेंट्रीच्या लिंकवर नेतात ते ट्विट ब्लॉक करण्यास सांगितलं होतं.
पण ट्विटरवरुन बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीसंबंधीच्या पोस्ट हटवल्याचं आपल्याला माहिती नव्हतं असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. बीबीसीच्या ट्विटर स्पेसवर मुलाखतीदरम्यान त्यांनी हे म्हटलं आहे. सोशल मीडियावर कुठला कन्टेट दिसावा याबाबत भारतातील नियम आणि कायदे कडक आहेत. त्यामुळं आम्ही देशाच्या कायद्यांबाहेर जाऊ शकत नाही, असं उत्तर मस्क यांनी दिलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.